शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

Azam Khan : सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली; तुरुंगातून रुग्णालयात दाखल, ऑक्सिजन लेव्हल झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 09:20 IST

Samajwadi Party leader Azam Khan And CoronaVirus Live Updates : आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाब यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान (Azam Khan) यांना सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असताना  आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाह यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आझम खान यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. 

मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम खान खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सुरुवातीला केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये कोरोनाचं मॉडरेट इंफेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना 4 लीटर ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याचं देखील राकेश कपूर यांनी सांगितलं. तसेच त्यांची ऑक्सिजन लेव्हल 90 च्या आसपास असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती  डॉक्टरांनी दिली आहे. 

डॉक्टरांनी आझम खान यांच्या मुलाच्या प्रकृती विषयी देखील माहिती दिली आहे. मोहम्मद अब्दुल्लाह खान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रविवारी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग

आझम खान आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत.  सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात ते कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खान यांच्यासोबतच तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आझम खान आणि त्यांच्या मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलjailतुरुंगdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन