सलमानला बेल पण मला जेल - आसाराम बापू

By Admin | Updated: May 14, 2015 13:50 IST2015-05-14T13:46:55+5:302015-05-14T13:50:51+5:30

बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या २० महिन्यांपासून तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सलमान खानला जामीन मिळाल्याचे संतापले आहेत.

Salman got bail but I was imprisoned - Asaram Bapu | सलमानला बेल पण मला जेल - आसाराम बापू

सलमानला बेल पण मला जेल - आसाराम बापू

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या २० महिन्यांपासून तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सलमान खानला जामीन मिळाल्याचे संतापले आहेत. सलमान २० मिनीटंही तुरुंगामध्ये राहिला नाही पण मी गेल्या २० महिन्यापासून तुरुंगात आहे असे आसाराम बापूंनी म्हटले आहे. 

आश्रमातील तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापू सध्या तुरुंगात असून विविध कारणं देऊनही आसाराम बापूंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे हिट अँड रनप्रकरणी शिक्षा झाल्यावर सलमान खानला ताबडतोब जामीन मिळाला आहे. या सर्व प्रकाराने आता आसाराम बापू चांगलेच वैतागले आहे. माझा जादू माझ्यासाठीच काम करत नाही. आता सलमानकडूनच जादू शिकावी लागेल असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सुनावणीसाठी न्यायालयात येताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Web Title: Salman got bail but I was imprisoned - Asaram Bapu