पगारातील वाढती दरी...
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:02+5:302015-03-08T00:31:02+5:30
पगारातील वाढती दरी...

पगारातील वाढती दरी...
प ारातील वाढती दरी... मुंबई : गेल्या सात वर्षांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पगारामधील दरी वाढत चालली आहे. भारतात २००८ पासून २०१४ पर्यंतच्या म्हणजेच सात वर्षांच्या कालावधीत पगाराची दरी ५२.१४ टक्के इतकी वाढली आहे. जागतिक मंदीमुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात ही दरी वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पगारातील ही दरी भारताच्या बरोबरीनेच चीनमध्ये देखील वाढते आहे. ब्राझीलमध्ये पगाराची दरी थोड्या प्रमाणात वाढलेली आहे. तर, उलटपक्षी रशियामध्ये उच्चपदस्थ आणि कर्मचार्यांच्या पगारातील दरी कमी झाली आहे. जगभरातील देशांत पगाराच्या पद्धतीचा सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, २००८ साली सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करणार्या व्यक्तीला मिळणार्या पगारापेक्षा ७.७ पट जास्त पगार हा उच्चपदस्थ अधिकार्याला मिळत होता. सात वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पगारातील चार पटीने वाढलेली आहे. २०१४ मध्ये सर्वसामान्य कर्मचार्यांना मिळणार्या पगारापेक्षा ११.७ पट जास्त पगार उच्चपदस्थ अधिकार्यांना मिळतो आहे. लिपीक, सुपरवाइझर, फक्त पदवीधर व्यक्ती आणि विभाग प्रमुख यांच्या पगारातील तफावत जास्त प्रमाणात वाढत गेली आहे. जागतिक आर्थिक मंदी हे पगारातील तफावत वाढत जाण्याचे प्रमुख एक कारण आहे, असे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांतल्या आर्थिक मंदीमुळे ही तफावत वाढत गेली आहे. भारतात पगारात वाढत जाणारी तफावत ही सातत्याने वाढत जाणारी आहे. २००८ मध्ये ही तफावत ७.७ पट होती. २०११ मध्ये ९.२ पट इतकी होती आणि २०१४ मध्ये ही तफावत ११.७ पटीने वाढली आहे. वाढणारी स्पर्धा आणि नोकरीच्या मर्यादित संधी यामुळे ही तफावत वाढत चालली आहे. उच्चपदस्थ अधिकार्यांचे काम करताना कल्पकता, कौशल्य लागते. याचबरोबरीने ते काम जोखमीचे, जबाबदारीचे असते. यामुळेच त्यांना जास्त पगार दिला जात असल्याचे दिसून आले. ................................(चौकट)कसे केले सर्वेक्षण? जगातील ११० देशातील २४ हजार कार्यालयात/संस्थांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १६ दशलक्ष कर्मचार्यांचा समावेश होता. त्या कार्यालयातील / संस्थांतील उच्चपदस्थ अधिकारी आणि सर्वसामान्य कर्मचारी या दोघांच्या पगारातील फरक आर्थिक मंदीपासून म्हणजे २००८ पासून तपासण्यात आला.