शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

सामूहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात जाऊन भेटले साक्षी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 10:44 AM

भाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती.

सीतापूर : उत्तरप्रदेशच्या उन्नाव मतदारसंघातून जिंकलेले भाजपाचे खासदार आणि वाचाळ नेते साक्षी महाराज हे बुधवारी सीतापूरला आले होते. यावेळी त्यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येतील आरोपी बांगरमऊचा आमदार कुलदीप सिंह सेंगरची जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली. 

यावेळी कुलदीप सिंह यांना साक्षी महाराजांनी यशस्वी आणि लोकप्रिय असल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे आभार मानने योग्य वाटले म्हणून तुरुंगात भेटायला आलो, असे त्यांनी सांगितले. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. 

बुधवारी ईदनिमित्त सुट्टी होती. तरिही तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्यास दिले. यासाठी साक्षी महाराजांनी तुरुंग प्रशासनाचेही आभार मानले. आमदार खूप काळापासून तुरुंगात आहेत. त्यांची समस्या आणि सुविधांची काळजी मी करू शकत नाही. यामुळे केवळ भेटण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

 

2018 पासून तुरुंगात आहेत कुलदीप सिंहभाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. जून, 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीने आमदार कुलदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याने पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर वातावरण संतप्त बनल्याने 13 एप्रिल 2018 मध्ये आमदाराला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. 

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगरUttar Pradeshउत्तर प्रदेश