सागर चौधरीला जामीन, पण तालुकाबंदी

By Admin | Updated: November 26, 2015 23:57 IST2015-11-26T23:57:57+5:302015-11-26T23:57:57+5:30

(सादरे आत्महत्या प्रकरण)

Sagar Chaudhary will be arrested, but Talukabadi | सागर चौधरीला जामीन, पण तालुकाबंदी

सागर चौधरीला जामीन, पण तालुकाबंदी

(स
ादरे आत्महत्या प्रकरण)

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात वाळूमाफिया सागर चौधरी याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, परंतु जळगाव तालुक्यात येण्यास त्याला बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस पंचवटी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वाळूमाफिया सागर चौधरीसह पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्याकडून छळ होत असल्याचा उल्लेख आढळून आल्याने तिघांविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सागरने नाशिक न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्याने मुबंई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गुरुवारी न्या.अनुजा प्रभुदेसाई यांनी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटी-शर्तीला अधीन राहून त्याचा जामीन मंजूर केला. सागर याच्याकडून प्रसिध्द वकील अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली.

Web Title: Sagar Chaudhary will be arrested, but Talukabadi