आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:08 IST2025-08-11T15:07:44+5:302025-08-11T15:08:31+5:30

सफीन हसन यांनी यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा जन्म १९९५ मध्ये गुजरातमधील पालनपूर येथे झाला.

safin hasan success story youngest ips officer of the country | आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS

आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS

देशात अशा काही प्रेरणादायी गोष्ट घडत असतात ज्या केवळ हृदयाला स्पर्श करत नाहीत तर आपलं स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रेरणा देतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. सफीन हसन हे एका मजूर कुटुंबातील होते आणि भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी झाले आहेत. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. मोठ्या मेहनतीने त्यांनी हे यश मिळवलं आहे. 

सफीन हसन यांनी यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा जन्म १९९५ मध्ये गुजरातमधील पालनपूर येथे झाला. रिपोर्टनुसार, सफीन यांचे पालक हिरे उद्योगात काम करायचे, परंतु २००० मध्ये दोघांनाही नोकरी गमवावी लागली. त्यानंतर, त्याची आई इतरांच्या घरी जेवण बनवू लागली आणि वडील विटा वाहून कुटुंबाचं पोट भरत असत. 

कठीण परिस्थितीतही सफिन यांचं स्वप्न खूप मोठं होतं. जेव्हा एक कलेक्टर त्याच्या शाळेत आले तेव्हा त्याच्या डोक्यात आयएएस होण्याचा विचार आला. काही तरी वेगळं करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शाळेने त्यांची अकरावी आणि बारावीची फी माफ केली. नातेवाईकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पाठिंबा दिला आणि सफीन यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

पण नशिबाने आणखी एक परीक्षा घेतली. २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जात असताना, त्यांचा मोठा अपघात झाला. सफीन यांनी जखमी अवस्थेत परीक्षा दिली, त्यानंतर रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी करण्यात आली. पण ते हारले नाहीत. शेवटी त्यांना कठोर परिश्रमाचं फळ मिळालं. सफीन यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया ५७० रँक मिळवला आणि वयाच्या २२ व्या वर्षी आयपीएस झाले. आज सफीन हसन लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. 

Web Title: safin hasan success story youngest ips officer of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.