शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकर?.. मी नाही ओळखत - मारिया शारापोव्हा

By admin | Updated: July 2, 2014 18:52 IST

टेनिस स्टार असलेल्या आणि नुकतीच फ्रेंच ओपन विजेती ठरलेल्या मारिया शारापोव्हाला सचिन तेंडुलकर कोण आहे हे माहित नाही.

ऑनलाइन टीम 
पॅरिस, दि. २ - क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात करोडो चाहते आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिनची लोकांवरील जादू कायम आहे. परंतु टेनिस स्टार असलेल्या आणि नुकतीच फ्रेंच ओपन विजेती ठरलेल्या मारिया शारापोव्हाला सचिन तेंडुलकर कोण आहे हे माहित नाही. 
सचिनने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली होती. त्याच्यासोबत रॉयल बॉक्समध्ये इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एन्ड्रयू स्ट्रॉस, फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहॅम आणि गोल्फपटू इयान पॉल्टर हेही सामना पाहत होते. सामन्यानंतर मारियाला प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीबद्दल  प्रश्न विचारण्यात आला असता तिने आपण बेकहॅमला ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला सचिन तेंडुलकरबद्दल आठवण करून दिली असता, तिने कोण सचिन तेंडुलकर असा प्रश्न विचारला. मी बेकहॅमला ओळखते मात्र मी सचिन तेंडुलकरला खरेच ओळखत नाही असे तिने सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, सचिनला क्रिकेटबरोबरच टेनिस खेळायला आणि पाहायला आवडते. सचिनने अनेकदा विम्बलडनमध्ये जाऊन कित्येक सामने पाहिले असून टेनिसमध्ये १७ वेळा ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणारा रॉजर फेडरर हा सचिनचा चांगला मित्र आहे.