शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 9:22 AM

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. यासंदर्भात एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरस संदर्भात पारपडली सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फभारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 107 वर एआयआयएमएसने सुरू केला हेल्पलाइन नंबर

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 107 वर पोहोचली आहे. यात 10 पेक्षा अधिक नागरिक परदेशी आहेत. कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सार्क देशांच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उचलला. यावेळी पाकिस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी, कोरोनाशी लढा देण्यासाठी काश्मीरवरील बंधने दूर करणे आवश्यक आहे.

एआयआयएमएसने सुरू केला हेल्पलाईन नंबर -

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. यासंदर्भात एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

कोरोनाग्रस्तांची राज्यवार अकडेवारी अशी -

केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात 13, दिल्लीत 7, कर्नाटकात 6, तेलंगानामध्ये 3, लद्दाखमध्ये 3, राजस्थानमध्ये 2, जम्मू काश्मीरमध्ये 2, तामिळनाडू, पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढूळन आले आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 17 परदेशी नागरिकांपैकी 14 जणांना हरियाणा, 2 जणांना राजस्थान आणि एकाला  उत्तर प्रदेशात ठेवण्यात आले आहे. 

देशभरात रविवारी 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात महाराष्ट्रात 12, तेलंगानत 2, दिल्लीत 1 आणि कर्नाटकातही 1 रुग्ण सापडला. कोरोनामुळे भारतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची माहिती दडविल्याने देशात पहिला गुन्हा दाखल

कोरोनाची लागण झाल्याची माहिती दडविणे व प्रतिबंधक उपाय योजण्यात सरकारला सहकार्य न देणे याबद्दल देशातील पहिला फौजदारी गुन्हा रविवारी आग्रा पोलिसांनी नोंदविला.

आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीखेरीज हे दाम्पत्य ग्रीस व फ्रान्सलाही गेले होते.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी