शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडर अनुदानाचे पहिले पाढे पंचावन्न बॅकेत खाते काढण्यासाठी पुन्हा होणार धावपळ

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

घरघुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत ही योजना जानेवारी २०१५ पासून नांदेड जिल्‘ात सुरु होत आहे़ प्रायोगिक स्वरुपात राज्यातील काही जिल्‘ात १५ नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना लागू झाली आहे़ परंतु आता जानेवारीपासून सर्व राज्यातच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा गॅस ग्राहकांना बँक खाते व आधार कार्डासाठी खेटे मारावे लागणार आहेत़

घरघुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत ही योजना जानेवारी २०१५ पासून नांदेड जिल्‘ात सुरु होत आहे़ प्रायोगिक स्वरुपात राज्यातील काही जिल्‘ात १५ नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना लागू झाली आहे़ परंतु आता जानेवारीपासून सर्व राज्यातच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा गॅस ग्राहकांना बँक खाते व आधार कार्डासाठी खेटे मारावे लागणार आहेत़
यापूर्वी आघाडी शासनाच्या काळात गॅस सिलेंडरचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना सुरु करण्यात आली होती़ परंतु त्यावेळी भाजपासह सर्वच विरोधी पक्षांनी या योजनेवर टिका केली होती़ परंतु आता युती शासनानेही याच योजनेची रि ओढली आहे़ या योजनेअंतर्गत घरघुती एलपीजी गॅस धारकांना विना अनुदानित सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे़ ज्याचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे़ पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एलपीजी सबसिडी ही योजना सुरु केली आहे़ ज्या गॅस ग्राहकांकडे आधार कार्ड आहे़ त्यांनी आधार क्रमांक राष्ट्रीयकृत किंवा ऑनलाईन बँकेला व गॅस वितरकांना फॉर्म क्रमांक १ व १ भरुन सोबत आधार कार्ड व पासबुक ची दोन-दोन प्रत द्यावयाची आहे़
ज्या गॅस ग्राहकांकडे आधार कार्ड नाही त्यांनी बँक खात्याची माहिती फॉर्म क्रमांक ४ मध्ये भरुन गॅस वितरकाला द्यावी किंवा आपल्या एलपीजी आयडी बँकेत जावून फॉर्म क्रमांक ३ भरुन जमा करणे़ संलग्नीकरणासाठी लागणारे चार प्रकारचे अर्ज निशुल्क आपल्या गॅस एजन्सीवर उपलब्ध आहेत़ आधार कार्ड व बँक खाते पास बुकचे दोन-दोन प्रत बँकेत व गॅस वितरकाकडे त्वरित देवून संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावयाची आहे़ यापूर्वी ज्यांनी या योजनेत सहभाग घेतला व त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे अनुदान जमा झाले अशांना काही करण्याची गरज नाही़ मात्र ज्यांनी सहभाग घेतला परंतु सबसिडी जमा झाली नाही़ त्यांनी संलग्नीकरण स्थिती बँकेत व तेल कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर १८००२३३३५५५ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी केले आहे़
परंतु या योजनेमुळे पुन्हा एकदा बँकेत खाते व आधार कार्डासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे़