उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:04 IST2025-08-19T14:01:52+5:302025-08-19T14:04:40+5:30

Uttarakhand Assembly News: उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार गोंधळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

Ruckus in Uttarakhand Assembly, table smashed, microphone broken, angry Speaker leaves | उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या

उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या

उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार गोंधळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, पंचायत निवडणुकीत झालेला गोंधळ यावर विशेष चर्चेची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले.

आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ११ ते १२.३० या वेळेत विरोधकांनी वारंवार गोंधळ घातला. या दरम्यान, विरोधी पक्षातील काही सदस्यांनी थेट हौद्यात धाव घेत गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी काही आमदारांनी सचिवांचं टेबल उचलून उटलं केलं. तसेच टेबलावरचे माईकही उखडून काढले. त्यामुळे संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष सभागृहातून निघून गेल्या.

विरोधी पक्ष राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, पंचायत निवडणकुती झालेला गोंधळ यावरून चर्चेची मागणी करत होते. पंचायत निवडणुकीत सरकारच्या इशाऱ्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवले गेले, असा आरोप काँग्रेसचे आमदार प्रीतम सिंह यांनी केला. 

Web Title: Ruckus in Uttarakhand Assembly, table smashed, microphone broken, angry Speaker leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.