५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:04 IST2025-08-16T14:01:56+5:302025-08-16T14:04:51+5:30

RSS On Trump Tariff: कोणीही भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीने घाबरवू शकत नाही, असे सांगत संघ नेत्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.

rss leader ram madhav speaks directly on 50 percent america trump tariff and said india decisions are made keeping national interest in mind | ५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”

५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”

RSS On Trump Tariff: काँग्रेस आणि काही अन्य लोक सार्वजनिक मंचावरुन आरएसएसचा विरोध करुन राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करतात. जे देशाची एकता, अखंडता आणि संप्रभुतेविरोधात आहेत, आरएसएस त्या सर्वांचा विरोध करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. आम्ही सर्व आरएसएस कार्यकर्ते आनंदी झालो. फक्त आम्हीच नाही, तर संघटनेच समर्थन करणारे अन्य लोकही खुश झाले. पण काही लोकांना हे आवडले नाही. ऑक्टोंबर महिन्यात संघ आपल्या १०० व्या वर्षाला सुरुवात करणार आहे. मागच्या १०० वर्षांत ही संघटना मजबूत झाली आहे, असे RSS ज्येष्ठ नेते राम माधव यांनी स्पष्टपणे सांगितले.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून वारंवार भारताविरोधी विधाने केली जात आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरने दिलेली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण आणि अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के ट्रम्प टॅरिफबाबत राम माधव यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. कोणीही भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीने घाबरवू शकत नाही, असे राम माधव यांनी नमूद केले.

राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय

आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांची शैली समजून घ्यावी लागेल. ट्रम्प एक अशी व्यक्ती आहे की, मोठी आघाडी, समान मूल्यांऐवजी विशेष द्विपक्षीय संबंध आणि करारांवर भर देतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करणे हाच केवळ ट्रम्प यांचा उद्देश आहे. भारत या आव्हानाचा सामना करण्यात अपयशी ठरलेला नाही. भारत अनेक पावले उचल आहे, प्रत्येक निर्णय राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन घेतला जात आहे, असे प्रतिपादन राम माधव यांनी केले. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना जन्माला आली होती. १०० वर्षांची राष्ट्रसेवा ही अभिमानाची गोष्ट आहे. वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाने संघाने १०० वर्षे आपले जीवन भारतमातेच्या कल्याणासाठी समर्पित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे, ज्याची ओळख सेवा, समर्पण, संघटना आणि अतुलनीय शिस्तही आहे. 

 

Web Title: rss leader ram madhav speaks directly on 50 percent america trump tariff and said india decisions are made keeping national interest in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.