शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 3:03 PM

कार्यक्रमासाठी आरएसएस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं दिसत आहे. राहुल गांधींकडून आरएसएसवर वारंवार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. एकीकडे राहुल गांधी आरएसएसवर जहरी टीका करत असताना दुसरीकडे राहुल गांधींना आरएसएसकडून कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.   

आरएसएसनं पुढील महिन्यात 'भविष्य का भारत' कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आरएसएसचा हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. 'भविष्य का भारत' या कार्यक्रमासाठी राहुल गांधी व येचुरी यांच्यासहीत अन्य राजकीय नेत्यांनाही RSS निमंत्रण पाठवणार आहे.

दरम्यान, राहुल गांधींकडून वारंवार आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीवर आक्रमकरित्या निशाणा साधण्यात येतो. आरएसएस देशाची विभागणी करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यापूर्वी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरसंघचालक मोहन भागवत 'भविष्य का भारत- आरएसएस का दृष्टिकोण' या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. 

कार्यक्रमाबाबत बोलताना RSS प्रचारक अरुण कुमार यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनाही यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. यावेळेस राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, 'संपूर्ण जग मुस्लिम दहशतवाद, मुस्लिम ब्रदरहुडपासून किती पीडित आहे. हे जर ते जाणत असते तर त्यांनी असे विधान केले नसते. जे आतापर्यंत भारताला समजू शकलेले नाहीत त्यांना संघ काय समजणार?', अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल चढवला आहे.   

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस