शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 08:50 IST

RSS Mohan Bhagwat on Hindu Bharat: "हिंदू धर्म हा केवळ धार्मिक शब्द नाही, ही एक सभ्यतेची ओळख आहे"

RSS Mohan Bhagwat on Hindu Bharat: ज्या व्यक्तीला भारताचा अभिमान वाटतो, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. हिंदू धर्माची ओळख केवळ धार्मिक नसून ती एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू एकच आहेत. भारत मूळतः 'हिंदू राष्ट्र'च आहे. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची वेगळी गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

भारताची सभ्यता हे हिंदू राष्ट्राची ओळख

मोहन भागवत म्हणाले, "भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. भारताच्या संस्कृतीतून आधीच हिंदू राष्ट्राचे प्रतिबिंब दिसते. हिंदू धर्म हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेत रुजलेली एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू हे समानार्थी आहेत. भारताला 'हिंदू राष्ट्र' होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही. भारताची सभ्यता हेच त्याचे प्रमाण आहे."

संघ म्हणजे काय? भागवत म्हणतात...

"संघाची स्थापना कोणाचाही विरोध करण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी झाली नाही, तर प्रत्येकाच्या स्वयंशिस्तीसाठी आणि चारित्र्य निर्माणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी झाली. भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या उद्देशाने संघ कार्यरत आहे. भारताला 'वर्ल्ड लीडर' बनवण्यात योगदान देण्यासाठी संघाची कार्यशैली सुरू आहे. विविधतेत भारताला एकत्र आणण्याची पद्धत म्हणजे संघ (RSS)," असेही भागवत यांनी रोखठोकपणे सांगितले.

घुसखोरीबाबत व्यक्त केली चिंता

आसाममधील लोकसंख्या बदलांबद्दलच्या चिंता दूर करण्यासाठी मोहन भागवत यांनी आत्मविश्वास, दक्षता आणि स्वतःच्या भूमी आणि ओळखीबद्दल दृढ आसक्ती बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी बेकायदेशीर स्थलांतर, हिंदूंसाठी तीन मुलांचा आदर्श यासह संतुलित लोकसंख्या धोरणाची आवश्यकता आणि फुटीर धार्मिक धर्मांतरांना विरोध करण्याचे महत्त्व यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. आपण आत्मविश्वास ठेवण्यासोबत दक्षता बाळगली पाहिजे. तसेच आपली जमीन आणि संस्कृती याच्याशी आसक्ती राखली पाहिजे असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांनी निःस्वार्थपणे एकत्र काम केले पाहिजे, तरच या घुसखोरीला आळा बसेल, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : India doesn't need Hindu Nation declaration, Hindu is one who...

Web Summary : Mohan Bhagwat stated India is inherently a Hindu nation, needing no formal declaration. He defined Hindu as someone taking pride in India, emphasizing cultural identity over religious. He highlighted RSS's role in character building and national unity, addressing concerns about infiltration and demographic changes.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतHinduहिंदूIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ