२३ हजार कोटी रुपये पीडितांना वाटा, सरन्यायाधीशांरसमोरच झाला युक्तिवाद, कोर्टात पसरली शांतता, मग...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:59 IST2025-08-07T18:59:02+5:302025-08-07T18:59:27+5:30

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांसमोर आज एक अजब युक्तिवाद झाला. या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एक असा युक्तिवाद केला ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले.

Rs 23,000 crore to be shared with victims, arguments were held before the Chief Justice, silence prevailed in the court, then... | २३ हजार कोटी रुपये पीडितांना वाटा, सरन्यायाधीशांरसमोरच झाला युक्तिवाद, कोर्टात पसरली शांतता, मग...  

२३ हजार कोटी रुपये पीडितांना वाटा, सरन्यायाधीशांरसमोरच झाला युक्तिवाद, कोर्टात पसरली शांतता, मग...  

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांसमोर आज एक अजब युक्तिवाद झाला. या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एक असा युक्तिवाद केला ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. ईडीला कारवायांदरम्यान, जो २३ हजार कोटी रुपये काळ्या पैशाच्या स्वरूपात सापडले आहेत. ते पीडितांना वाटून टाकले जावेत, अशी मागणी मेहता यांनी केली. मेहता यांच्या या युक्तिवादाने कोर्टात क्षणभर शांतता पसरली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा युक्तिवाद सरन्यायाधीश गवई आणि न्यामूर्ती सतीशचंद्र मिश्रा यांचं खंडपीठ भूषण स्टिल अँड पॉवर लिमिटेडशी संबंधित जेएसडब्ल्यू स्टिलच्या एका प्रकरणातील निर्णयाचं परीक्षण करत असताना केला. सर्वोच्च न्यायालयाने २ मे रोजी भूषण स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या जेएसडब्ल्यू स्टिलची तोडगा याचिका फेटाळून लावताना तिला दिवाळं आणि आयबीसीचं उल्लंघन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आयबीसीअंतर्गत बीएसपीएलच्या परिसमापनाचेही आदेश दिले होते.

दरम्यान, ३१ जुलै रोजी सरन्यायाधीश बी. आर. गवई  यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ३१ जुलै रोजी हा निर्णय मागे घेतला होता. तसेच याच्याशी संबंधित पुनर्विचार याचिकांवर नव्याने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. सुनावणीदरम्यान, एका वकिलाने बीपीएसएल प्रकरणामध्ये ईडीच्या चौकशीचाही हवाला दिला. त्यावर सरन्यायाधीशांनी ईडी इथेही उपस्थित आहे का? असे हसत हसत विचारले. त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी  सांगितले की, मी एक तथ्थ्य सांगू इच्छितो की, कुठेही जप्त झालेली रक्कम ही सरकारी खजिन्यात जमा होत नाही. ही रक्कम आर्थिक गुन्ह्यांमधील पीडितांना दिली जाते. ईडीने जवळपास २३ हजार कोटींचा काळा पैसा हा जप्त करून पीडितांना दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.  

Web Title: Rs 23,000 crore to be shared with victims, arguments were held before the Chief Justice, silence prevailed in the court, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.