शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रोटोमॅक घोटाळ्याप्रकरणी कोठारी पिता-पुत्र अटकेत, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 9:02 PM

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यानंतर पेन उत्पादक रोटोमॅक समूहाचा कर्ज घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोटोमॅक पेन्स कंपनीचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारी याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यानंतर पेन उत्पादक रोटोमॅक समूहाचा कर्ज घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोटोमॅक पेन्स कंपनीचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारी याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 

दरम्यान, पेन उत्पादक रोटोमॅक समूहाचा कर्ज घोटाळा उघडकीस आला असतानाच, या कंपनीने करचोरी केल्याचेही समोर येत आहे. या प्रकरणी आयकर खात्याकडून 14 बँक खाती गोठविण्यात आली आहेत. यातील बहुतांश खाती उत्तर प्रदेशातील विविध बँक शाखांतील आहेत.

कानपूरस्थित उद्योग समूहाने 3,695 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचे नुकतेच उघडकीस आले असून, या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. रोटोमॅक ग्लोबल प्रा. लि. ही कंपनी, तसेच कंपनीचे संचालक विक्रम कोठारी, त्यांची पत्नी साधना कोठारी आणि मुलगा राहुल कोठारी यांच्याविरुद्ध सीबीआयने फौजदारी तक्रार दाखल केला होता. बँक आॅफ बडोदाच्या काही अज्ञात अधिका-यांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी गेल्या सोमवारी त्यांच्याविरोधात छापेमारीही करण्यात आली होती.

मोदी सरकारच्या काळात उघड झालेला हा दुसरा मोठा बँक घोटाळा ठरला आहे. या आधी अब्जाधीश ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेत केलेला ११,४00 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.नीरव मोदीने घडविलेल्या घोटाळ्यातील रक्कम ३0 हजार कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.बँक आॅफ बडोदाने दिलेल्या तक्रारीनुसार, रोटोमॅक कंपनी समूहाने बँक समूहास ३,६९५ कोटी रुपयांना फसविले आहे. कर्ज घेऊन त्याची परतफेड केलेली नाही. यात २,९१९ कोटी रुपयांचे मुद्दल कर्ज असून, उरलेली रक्कम रक्कम व्याजाची आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपाखालीही गुन्हा नोंदविला आहे. बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात घेण्यात आलेला पैसा अन्यत्र वळविण्यात आला आहे का, याचा तपास ईडी करणार आहे. आरोपींनी काही बेकायदेशीर मालमत्ता आणि काळा पैसा जमविला आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक