राजस्थानमध्ये ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान इमारतीचे छत कोसळले, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 20:47 IST2018-07-29T19:21:46+5:302018-07-29T20:47:11+5:30

राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे रविवारी संध्याकाळी ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे.

The roof of the building collapsed during the tractor competition in Rajasthan, more than 300 injured and 50 others serious | राजस्थानमध्ये ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान इमारतीचे छत कोसळले, अनेक जण जखमी

राजस्थानमध्ये ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान इमारतीचे छत कोसळले, अनेक जण जखमी

जयपूर - राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे रविवारी संध्याकाळी ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी शेजारील इमारतीच्या छतावर  झालेल्या गर्दीमुळे इमारतीचा छत कोसळून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघातानंतर श्रीगंगानगरचे पोलिस अधीक्षक योगेश यादव यांनी सांगितले की, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एकूण 17 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये छतावर बसलेले शेकडो प्रेक्षक छत कोसळल्याने खाली पडताना दिसत आहेत. 



श्रीगंगानगर परिसर शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे शेतीशी संबंधित अनेक खेळ आजोजित केले जातात. ट्रॅक्टरची शर्यत हा त्यापैकीच एक खेळ आहे. 



 

Web Title: The roof of the building collapsed during the tractor competition in Rajasthan, more than 300 injured and 50 others serious