'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:40 IST2025-06-26T15:39:13+5:302025-06-26T15:40:36+5:30

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

'Romance' turns out to be expensive! Villagers give shocking punishment to boyfriend caught with mother of 4 children | 'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

झारखंडच्या साहिबगंजमध्ये एका युवकाला चार मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

मध्यरात्रीचा 'रोमान्स' आणि गावकऱ्यांचा छापा
ही घटना बोरियों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बास्को गावातील आहे. सोमवारी रात्री उशिरा गावातील एका ३० वर्षीय विवाहित महिलेला आणि एका २२ वर्षीय युवकाला आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिले. महिला या गावतीलच आहे, तर युवक उमेश सिंह हा जवळच्या वनगावा येथील टेम्पो चालक आहे.

दोरखंडाने बांधले, मारहाण केली आणि...
गावकऱ्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर ते पळून जाऊ नये म्हणून दोरीने बांधून ठेवले. इतकेच नव्हे, तर त्यांना बेदम मारहाणही केली. प्रियकर उमेश सिंह याला इतके मारले की, तो बेशुद्ध झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पंचायतीने ठोठावला अजब दंड!
मध्यरात्री घडलेला या घटनेनंतर सकाळ झाली आणि गावात पंचायत बसली. पंचायतीने त्वरित निर्णय देत प्रेमी युगुलाला ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही दंडाची संपूर्ण रक्कम तरुणालाच भरावी लागणार आहे.

पोलिसांची एन्ट्री आणि सुटका
यादरम्यान, सुदैवाने कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या तावडीतून दोघांची सुटका केली. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, त्याला या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आधीपासूनच संशय होता. एसडीपीओ किशोर तिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाने पोलिसांत लेखी तक्रार दिलेली नाही. मात्र, पोलीस आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: 'Romance' turns out to be expensive! Villagers give shocking punishment to boyfriend caught with mother of 4 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.