Rohini Acharya : "कठपुतली बने शहजादा"; तेजस्वी यादव 'कार्यकारी अध्यक्ष' होताच सख्ख्या बहिणीने उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 15:11 IST2026-01-25T15:09:55+5:302026-01-25T15:11:50+5:30

Rohini Acharya And Tejashwi Yadav : तेजस्वी यांच्या निवडीवर बहीण रोहिणी आचार्य यांनी खोचक टोला मारत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहिणी यांनी तेजस्वी यांचा उल्लेख "कठपुतली बने शहजादा" असा केला आहे. 

Rohini Acharya on Tejashwi Yadav being elected as the national working president of rjd | Rohini Acharya : "कठपुतली बने शहजादा"; तेजस्वी यादव 'कार्यकारी अध्यक्ष' होताच सख्ख्या बहिणीने उडवली खिल्ली

Rohini Acharya : "कठपुतली बने शहजादा"; तेजस्वी यादव 'कार्यकारी अध्यक्ष' होताच सख्ख्या बहिणीने उडवली खिल्ली

लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची (RJD) धुरा आपला मुलगा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवली आहे. आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तेजस्वी यादव यांची 'कार्यकारी अध्यक्ष' म्हणून निवड करण्यात आली आहे. तेजस्वी यांच्या या निवडीवर त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी खोचक टोला मारत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहिणी यांनी तेजस्वी यांचा उल्लेख "कठपुतली बने शहजादा" असा केला आहे. 

तेजस्वी यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी 'X' वर पोस्ट करत निशाणा साधला आहे. "राजकारणातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या गौरवशाली कारकिर्दीचा एका अर्थाने अस्त झाला आहे. लाळघोटेपणा करणाऱ्यांचं आणि घुसखोर टोळीचं त्यांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या राजकुमाराच्या राज्याभिषेकाबद्दल अभिनंदन..." असं म्हणत रोहिणी यांनी सख्ख्या भावाला डिवचलं. 

कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

संघटना मजबूत करण्यासाठी, राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पक्षाची रणनीती आखण्यासाठी तेजस्वी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तेजस्वी यादव बिहारमध्ये पक्षाचा तरुण चेहरा म्हणून पुढे आले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

"तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी मजबूत होईल"

पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाचं आनंदाने स्वागत केलं असून तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी अधिक मजबूत होईल, असा मोठा दावा केला आहे. भविष्यातील रणनीतीचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या नियुक्तीमुळे येणाऱ्या काळात बिहारच्याराजकारणात आरजेडीची भूमिका अधिक प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 "RJD ची सूत्र घुसखोरांच्या हाती..."; रोहिणी आचार्य यांचा हल्लाबोल; तेजस्वी यादव निशाण्यावर

रोहिणी आचार्य यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लालू प्रसाद यादव यांची खरी राजकीय विचारधारा आणि त्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढाईला उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान पक्षाच्या आतूनच सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की, जो खऱ्या अर्थाने 'लालूवादी' असेल, तो पक्षाच्या सध्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या लोकांना प्रश्न विचारेल आणि लालूवाद कमकुवत करणाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेविरुद्ध आवाज उठवेल. 
 

Web Title : कठपुतली बने शहजादे: तेजस्वी यादव के RJD पद पर बहन का तंज।

Web Summary : तेजस्वी यादव RJD के कार्यकारी अध्यक्ष बने, जिस पर उनकी बहन रोहिणी आचार्य ने कटाक्ष किया। उन्होंने तेजस्वी को चापलूसों द्वारा नियंत्रित कठपुतली राजकुमार बताया, पार्टी की दिशा और नेतृत्व पर सवाल उठाए। वरिष्ठ नेताओं ने फैसले का स्वागत किया और तेजस्वी के नेतृत्व में RJD के मजबूत होने की उम्मीद जताई।

Web Title : Nephew made puppet prince: Sister taunts Tejashwi Yadav's RJD role.

Web Summary : Tejashwi Yadav became RJD's acting president, prompting his sister Rohini Acharya to criticize him. She called him a puppet prince controlled by sycophants, questioning the party's direction and leadership under him. Senior leaders welcomed the decision, expecting RJD to strengthen under Tejashwi.