शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

नामपूर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

नामपूर : नामपूर भागातील रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. देखभालीचा अभाव, निकृष्ट काम व पैशांचा अपहार यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते खड्यांमध्ये हरवलेले आहेत. प्रचंड खड्डे, अदृश्य झालेले डांबर व खोल गेलेल्या साइडप˜्या यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य झालेले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे निरपराधांना जीव गमवावा लागला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना खेद ना खंत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नामपूर : नामपूर भागातील रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. देखभालीचा अभाव, निकृष्ट काम व पैशांचा अपहार यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते खड्यांमध्ये हरवलेले आहेत. प्रचंड खड्डे, अदृश्य झालेले डांबर व खोल गेलेल्या साइडप˜्या यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य झालेले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे निरपराधांना जीव गमवावा लागला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना खेद ना खंत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मालेगाव-नामपूर-मुल्हेर-अहवा हा राज्य रस्ता आहे. या रस्त्याचे नूतनीकरण होऊन फक्त दोन वर्ष झाले आहेत. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यावर मोर्‍यांची कामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा खूपच सुसार आहे. अजंग, वडनेर या मोर्‍यांची कामे सुरु आहेत. जवळजवळ एक वर्षापासुन ही कामे सुरु आहेत. मोर्‍यांची कामे केलीत मात्र अजूनही या मोर्‍यांना सरंक्षक कठडे पुर्ण करण्याचे काम ठेकेदाराने केले नाही. सदर ठेकेदार या मोर्‍यांवरील वहातुक केव्हाही सुरु करतो व केव्हाही बंद करतो. मोरीवरुन प्रवास करु नये म्हणुन मातीचे स्पिड ब्रेकर तयार करुन ठेवले आहेत. प्रवास करु नये येथे दगड लावले जातात व काटेही ठेवली जातात. मात्र तब्बल वर्षभरापासून हे काम. सुरु असल्याने वाहनचालक या कामाला कंटाळले आहेत. या मोर्‍यांवरुन वहातुक करताना दिसतात. मात्र नित्कृष्ट काम व संरक्षक कठड्याविना असलेले हे काम अत्यंत धोकेदायक आहे. या मोर्‍यांवरुन वहातुक सुरु असल्याने नामपूर येथील कांदा व्यापारी बंटीशेठ नेर यांचा कांद्याने भरलेला कंटनेर या मोरीवरुन खाली कोसळला. लाखो रुपयाचे नुकसान झाले. अनेक वेळा काही दुचाकीस्वारांचा गाडीवरुन तोल सुटल्याने या ठिकाणी अपघातग्रस्त व्हावे लागले आहे.
आसखेडा गावाजवळ पुलाचे काम गेल्या दिड-दोन महिन्यापूर्वी हे काम सुरु झाले. मोरी अथवा पुलाचे काम करावयाचे असेल तर वहातुकीसाठी पर्यायी रस्ता करुन देणे ही सुविधा संबंधित ठेकेदाराला करुन द्यावी लागते. आसखेड्याजवळील पुलाचे काम सुरु झाले. पर्यायी रस्त्यांची उपलब्धता या ठेकेदाराने कोठलीही केली नाही. मात्र एस.टी. स्टॅण्डजवळुन वाघळे रस्त्याकडून आसखेडा गावातून ही वहातुक सुरु झाल्याने आसखेडकरांना या वहातुकीमुळे अपघात व धुळ प्रदुषणाच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. म्हणुन सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही वहातुक थांबवली.