लाडसावंगी-सिरजगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा सा.बां. विभागाला पडला विसर
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
लाडसावंगी : लाडसावंगी-सिरजगाव घाटी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मागील वर्षी कारपेट टाकण्यात आले होते; परंतु त्यावर डांबरीकरणाचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला आहे.
लाडसावंगी-सिरजगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा सा.बां. विभागाला पडला विसर
लाडसावंगी : लाडसावंगी-सिरजगाव घाटी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मागील वर्षी कारपेट टाकण्यात आले होते; परंतु त्यावर डांबरीकरणाचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला आहे.लाडसावंगी-सिरजगाव घाटी या रस्त्यावर मागील वर्षी एक कि.मी. डांबरीकरण आणि अर्ध्या रस्त्याचे कारपेटीकरण करण्यात आले होते; परंतु त्यावर त्वरित डांबरीकरण करणे गरजेचे असताना अर्धवट काम सोडून देण्यात आले. त्यात टाकलेले कारपेटही उखडल्याने वाहने घसरत आहेत. त्यात बर्याच वाहनधारकांना दुखापतही झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष करीत आहे. याविषयी संबंधित अभियंता जामवाडीकर यांच्याशी संपर्क साधला असता आठ दिवसांत काम सुरू होईल, अशी बतावणी करण्यात येत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.फोटो कॅप्शन :- लाडसावंगी-सिरजगाव घाटी या रस्त्यावर टाकलेले कारपेट असे उखडले आहे.रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणीलाडसावंगी : दुष्काळामुळे खरीप तर गेलेच; परंतु रबी पिकेही न आल्याने सध्या ग्रामीण भागात कामगारांच्या हाताला काम नाही. बरेच मजूर कंपन्यांच्या गेटवर जाऊन विचारणा करीत आहेत; परंतु कंपनीत जागा शिल्लक नाही म्हणून परत पाठवातात. किमान गावातच रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून हाताला काम देण्याची मागणी कामगारांतून होत आहे.