"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:26 IST2025-05-14T12:26:03+5:302025-05-14T12:26:22+5:30
Rambabu Singh : सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी असलेले रामबाबू सिंह हे देशासाठी शहीद झाले आहेत.

"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
बिहारच्या सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी असलेले रामबाबू सिंह हे देशासाठी शहीद झाले आहेत. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे त्यांना गोळी लागली. आज त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी आणलं जाईल. मंगळवारी तेजस्वी यादव यांनी रामबाबू सिंह यांचे मोठे भाऊ अखिलेश कुमार यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तेजस्वी यादव अखिलेश कुमार यांना म्हणाले की, "नमस्कार, सर्वांना अभिमान आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. खंबीर राहा. संपूर्ण बिहार, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे." तेजस्वी यादव यांनी रामबाबू सिंह हे किती वर्षांचे होते? असा प्रश्न विचारला. यावर अखिलेश यांनी २७ वर्षे उत्तर दिलं. तसेच शहीद जवानाच्या पार्थिवाबद्दल विचारलं की, ते पाटण्याला कधी पोहोचेल? यावर त्यांनी मंगळवारी रात्री तिथून निघेल असं सांगितलं.
सीमा पर शहीद हुए सीवान के वीर रामबाबू प्रसाद जी के परिजनों से वार्ता कर उन्हें सांत्वना दी वीर शहीद की शहादत को नमन किया। #TejashwiYadav#india#RJDpic.twitter.com/3UmfTPHd6n
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 14, 2025
"तुम्हा सर्वांना सलाम..."
व्हिडीओ कॉलवरील संभाषणादरम्यान, तेजस्वी यादव यांनी विचारलं, तुमच्या कुटुंबातील कोणी तिथे आहे का? यावर अखिलेश यांनी नाही असं उत्तर दिलं. तेजस्वी यादव म्हणाले, "आम्ही विमानतळावर असू. तुम्हा सर्वांना सलाम." रामबाबू सिंह गेल्या महिन्यात १० एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीवर रुजू झाले होते. सोमवारी कुटुंबाला फोन आला की ते शहीद झाले आहे. रामबाबू सिंह यांचं लग्न अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालं होतं.
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
शहीद जवान रामबाबू सिंह हे सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील रामविचार सिंह हे हरिहरपूर पंचायतीचे उपसरपंच होते. रामबाबू सिंह यांचे भाऊ अखिलेश सिंह हे झारखंडमधील हजारीबागमध्ये लोको पायलट म्हणून काम करतात. रामबाबू यांचे सासरे सुभाष चंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांचे जावई भारताची एअर डिफेंस सिस्टम S-400 चालवत होते. १० एप्रिल रोजी ते जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्युटीवर रुजू झाले. त्याची मुलगी धनबादमध्ये होती. काल (सोमवार) दुपारी १.३० वाजता, लष्कर मुख्यालयातून फोन आला की गोळी लागली आहे. यानंतर रामबाबू शहीद झाल्याची माहिती मिळाली.