Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:27 IST2025-06-07T10:25:49+5:302025-06-07T10:27:57+5:30

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या ताफ्यात घुसलेल्या एका ट्रकने कारला धडक दिली. ज्यामध्ये ३ सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

rjd Tejashwi Yadav convoy met with accident truck hits policemen injured hajipur | Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादवबिहारमध्ये एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. तेजस्वी यादव यांच्या ताफ्यात घुसलेल्या एका ट्रकने कारला धडक दिली. ज्यामध्ये ३ सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. रात्री १:३० च्या सुमारास तेजस्वी यादव मधेपुराहून पाटणा येथे परतत असताना राष्ट्रीय महामार्गावर चहा पिण्यासाठी थांबले तेव्हा हा अपघात झाला.

तेजस्वी यादव हे शक्ती यादव आणि काही राजद नेत्यांसह त्यांच्या गाडीतून खाली उतरले होते तेव्हा एका वेगवान ट्रकने ताफ्यात घुसून ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली. या अपघातात सुरक्षेसाठी तैनात असलेले तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. तेजस्वी यादव यांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले.

तेजस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही कार्यक्रमानंतर मधेपुराहून परतत होतो. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. तेव्हा एका ट्रकने माझ्या समोरच २-३ वाहनांना धडक दिली. आमचे सुरक्षा कर्मचारी उभे होते. ट्रकने त्यांना धडक दिली आणि २-३ लोक जखमी झाले. हा अपघात आमच्यापासून फक्त ५ फूट अंतरावर झाला."

"ट्रकचा वेग आणखी असता तर आमच्या जीवही धोक्यात आला असता. प्रशासनाने पुढे टोल नाक्यावर ट्रक पकडला. या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी." या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भविष्यात असे अपघात टाळता यावेत म्हणून केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांना या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने आढावा घ्यावा लागेल असं म्हटलं जात आहे.

Web Title: rjd Tejashwi Yadav convoy met with accident truck hits policemen injured hajipur