Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:22 IST2026-01-10T13:19:54+5:302026-01-10T13:22:04+5:30
Rohini Acharya : लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची एक नवी पोस्ट समोर आली आहे.

Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत ओढाताण आणि पक्षाच्या निर्णयांवरून उपस्थित होणारे प्रश्न, या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची एक नवी पोस्ट समोर आली आहे. रोहिणी यांनी 'एक्स' वर पोस्ट करत 'वारसा', 'ओळख', 'अस्तित्व' आणि 'आपल्या लोकांचं षडयंत्र' यावर भाष्य केलं आहे.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "अतिशय मेहनतीने निर्माण केलेला आणि उभा केलेला 'मोठा वारसा' उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते, त्यासाठी 'आपले' आणि आपल्यांच्या भोवती असलेले काही 'नवे षडयंत्रकारी' पुरेसे असतात. आश्चर्य तर तेव्हा वाटतं, जेव्हा ज्यांच्यामुळे आपली ओळख निर्माण झाली, ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे, त्याच ओळखीच्या खुणा पुसून टाकण्यासाठी स्वतःचीच माणसे कोणाच्या तरी सांगण्यावरून तयार होतात."

"कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
रोहिणी यांच्या विधानातून असा स्पष्ट संदेश जातो की, ज्या मूळ विचारांवर आणि संघर्षावर पक्ष उभा राहिला, त्यांनाच विसरण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिलं आहे की, "जेव्हा विवेकावर पडदा पडतो आणि अहंकार डोक्यात जातो, तेव्हा विनाशकारी प्रवृत्तीच तुमचे डोळे आणि कान बनून तुमची बुद्धी हरण करतात."
"मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
रोहिणी आचार्य यांच्या या पोस्टनंतर आरजेडीच्या अंतर्गत राजकारणाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतले नसलं तरी त्यांचे संकेत बरेच काही सांगून जातात. राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाचा अत्यंत महत्त्वाचा अर्थ काढला जात आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.