'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 20:14 IST2022-06-12T20:13:02+5:302022-06-12T20:14:38+5:30
UP police Rioters Beaten Video: भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत.

'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO
उत्तर प्रदेशात शुक्रवारच्या नमाजनंतर मोठा हिंसाचार उसळला होता. यानंतर, आता पोलीस आरोपींचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढत आहेत. दंगलीतील आरोपींसोबत कठोरपणे वागा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले आहेत. उत्तर प्रदेशात आरोपींना पकडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.
यातच, देवरियाचे भाजप आमदार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार शलभ मणी त्रिपाठी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत पोलीस दंगलीतील आरोपींना काठीने मारताना दिसत आहेत. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर, पोलिसांनी दंगेखोरांवर केलेल्या कारवाईला त्रिपाठी यांनी 'रिटर्न गिफ्ट', असे म्हटले आहे. व्हिडिओ ट्विट करताना, त्यानी 'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट', असे कॅप्शन दिले आहे.
भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत. त्रिपाठी यांनी पोलिसांच्या या कारवाईला 'रिटर्न गिफ्ट' म्हटल्याबद्दल अनेक पत्रकारांनी त्यांचा निषेध केला आहे. तर, अनेकांनी त्रिपाठी यांचे समर्थन करत, दंगेखोरांना रोखण्यासाठी पोलीस कारवाईची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
बलवाइयों को “रिटर्न गिफ़्ट” !! pic.twitter.com/6qQo74SNUj
— Dr. Shalabh Mani Tripathi (@shalabhmani) June 11, 2022
कपिल मिश्रा यांनीही केले ट्विट -
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी शलभ मणी त्रिपाठी यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. 'यूपी पोलीस रस्त्यावर जिहादींचा इलाज करत आहेत. तर शलभ मणी त्रिपाठी मीडियात बसलेल्या जिहादींचा इलाज कर आहेत,' असे मिश्रा यांनी म्हटले आहे. या हिंसाचारासंदर्भात यूपी पोलिसांनी आतापर्यंत आठ जिल्ह्यांतून 300 हून अधिक लोकांना अटक केली आहे.
सड़क पर उतरें जिहादियों का ईलाज यूपी पुलिस कर रही हैं
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) June 11, 2022
मीडिया में बैठे जिहादियों का ईलाज @shalabhmani जी कर रहे हैं