Reserve Bank of India office attendant vacancy 2021 bank jobs for 10th pass | खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कसा अन् कधी करायचा अर्ज? जाणून घ्या...

खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कसा अन् कधी करायचा अर्ज? जाणून घ्या...

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्य़ांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑफिस अटेंडंटच्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत (Vacancy 2021) देशभरातील शाखांमध्ये ही पदे भरली जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रदेशानुसार अर्ज करून आरबीआयमध्ये सरकारी नोकरी (Sarkari Job) मिळवू शकता. आरबीआयच्या या भरतीसाठी (RBI vacancy) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 

पदाचे नाव - ऑफिस अटेंडंट (Office Attendant)

पदांची संख्या (रीजननुसार)
कानपुर - 69 पदे
अहमदाबाद - 50 पदे
बंगळुरू - 28 पदे
भोपाळ - 25 पदे
भुवनेश्वर - 24 पदे
चंदीगड - 31 पदे
चेन्नई - 71 पदे
गुवाहाटी - 38 पदे


हैदराबाद - 57 पदे
जम्मू - 9 पदे
जयपूर - 43 पदे
कोलकाता - 35 पदे
मुंबई - 202 पदे
नागपूर - 55 पदे
नवी दिल्ली - 50 पदे
पटणा - 28 पदे
तिरुवनंतपुरम - 26 पदे
एकूण पदांची संख्या - 841

पे स्केल - 10,940 रुपये ते 23,700 रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार)

पात्रता - मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वय 18 ते 25 पर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज शुल्क - जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 450 रुपये. एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना 50 रुपये. आरबीआय ची वेबसाईट rbi.org.in द्वारे अर्ज करायचा आहे. 

महत्त्वाच्या तारख

ऑनलाईन अर्ज सुरू - 24 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन अर्जांची मुदत- 25 मार्च 2021

परीक्षेची तारीख - 9 आणि 10 एप्रिल 2021

निवड प्रक्रिया - ऑनलाईन आणि लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टच्या आधारे निवड केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Reserve Bank of India office attendant vacancy 2021 bank jobs for 10th pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.