मध्यपूर्वेतील मराठी नागरिकांचे परतण्यासाठी सरकारला साकडे; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:55 IST2026-03-10T08:55:19+5:302026-03-10T08:55:51+5:30

या नागरिकांना सध्या प्रतिबंधित हवाई क्षेत्र, वाढलेले विमानभाडे आणि लॉजिस्टिक अडचणींमुळे भारतात परतण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. 

Request to the government for the return of Marathi citizens in the Middle East; Request in a letter to Eknath Shinde, Sunetra Pawar | मध्यपूर्वेतील मराठी नागरिकांचे परतण्यासाठी सरकारला साकडे; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे विनंती

मध्यपूर्वेतील मराठी नागरिकांचे परतण्यासाठी सरकारला साकडे; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे विनंती

मुंबई : मध्यपूर्वेतील बहरीन, यूएई, कुवेत, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया येथे कामानिमित्त राहणाऱ्या मराठी नागरिकांना सध्या युद्धाच्या परिस्थितीमुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना करावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली आहे.

अनेक अडथळ्यांचा सामना

या नागरिकांना सध्या प्रतिबंधित हवाई क्षेत्र, वाढलेले विमानभाडे आणि लॉजिस्टिक अडचणींमुळे भारतात परतण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. 

महाराष्ट्र सरकारने यामध्ये मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा व बैठकीसाठी वेळ द्यावी, अशी मागणी दुबईतील सामाजिक कार्यकर्ते अभिजित इगावे यांनी केली आहे. 

या कुटुंबांसमोर वैद्यकीय उपचार, कुटुंबातील सदस्यांचे निधन, प्रसूतीची वेळ जवळ येणे, व्हिसाची मुदत संपणे आणि आर्थिक अडचणी अशा गंभीर समस्या आहेत. काही पुनर्वसन उड्डाणे उपलब्ध असली तरी त्यांचे भाडे सुमारे ८० हजार रुपये प्रतिप्रवासी असल्याने कामगार वर्गाला  ते परवडणारे नाही.

Web Title : मध्य पूर्व में मराठी नागरिकों ने वापसी के लिए सरकार से गुहार लगाई।

Web Summary : मध्य पूर्व में मराठी नागरिक संघर्ष के कारण कठिनाइयों का सामना कर रहे हैं। उन्होंने सुरक्षित वापसी के लिए सरकारी हस्तक्षेप का अनुरोध किया है, जिसमें उच्च हवाई किराया, वीजा मुद्दे, चिकित्सा आवश्यकताएं और वित्तीय बाधाएं शामिल हैं। महाराष्ट्र के नेताओं के साथ बैठक की मांग की गई है।

Web Title : Marathi citizens in Middle East plead for return assistance.

Web Summary : Marathi citizens in the Middle East face hardship due to conflict. They request government intervention for safe return, citing high airfares, visa issues, medical needs, and financial constraints. A meeting with Maharashtra's leaders is sought.