शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे ()

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

आमच्या अपेक्षा

आमच्या अपेक्षा
सुपर व्होट...
शिक्षक , कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मार्गी लागाव्या
नागपूर : सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक व कर्मचारी प्रयत्नशील असतात. परंतु शिक्षक व कर्मचाऱ्यांचेच प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहात असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासनाने यावर विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांना दर महिन्याला वेतन मिळेल अशी व्यवस्था अपेक्षित आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, यासाठी गेल्या ११ वर्षांपासून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या संघटना लढा देत आहेत. महापालिकेने सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेची उचल केली. परंतु वेतन पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात आले. ही फरकाची २ कोटी ७६ लाखांची रक्कम शिक्षक व कर्मचाऱ्यांना तातडीने देण्यात यावी. महापालिका प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. यावर कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या महापालिकेसाठी हे भूषणावह नाही. महापालिकेच्या १७ शाळा विनाअनुदानित आहे. या शाळा अनुदानित झाल्या तर महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होईल. या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. यासोबतच महापालिकेच्या शाळा स्मार्ट झाल्या पाहिजे. यासाठी शाळांचा दर्जा उंचावण्यासोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या पाहिजे, अशी अपेक्षा नागपूर महापालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष राजू गवरे यांनी व्यक्त केली.

नियमित वेतन मिळावे
महापालिकेच्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१६ पासून वेतन मिळालेले नाही.थकीत वेतन तातडीने देण्यात यावे. सहाव्या वेतन आयोगाची २००६ ते २०१० दरम्यानची थकबाकी भविष्यनिर्वाह निधीत जमा करण्यात यावी. महापालिकेच्या अनुदानित १७ शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे २० महिन्यांचे वेतन सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे.
राजू गवरे,अध्यक्ष महापालिका शिक्षक संघ