दिशाभूल करणारी सामग्री काढा; हायकोर्टाचे गुगलला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 09:37 IST2025-10-22T09:37:10+5:302025-10-22T09:37:35+5:30
गुगलला या निर्देशावर काही तांत्रिक मर्यादा किंवा आक्षेप असतील, तर ते शपथपत्र दाखल करू शकतात.

दिशाभूल करणारी सामग्री काढा; हायकोर्टाचे गुगलला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन करणारी, दिशाभूल करणारी आणि डीपफेक सामग्री काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सर्च इंजिन गुगल एलएलसीला दिले.
न्यायालयाने म्हटले आहे की, जर गुगलला या निर्देशावर काही तांत्रिक मर्यादा किंवा आक्षेप असतील, तर ते शपथपत्र दाखल करू शकतात.
यापूर्वी, सद्गुरू आणि ईशा फाउंडेशनने त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि विविध चॅनेल आणि सोशल मीडिया मध्यस्थांना बनावट आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ, पोस्ट आणि जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.