"धंदा करने का है तो...."; #Reject_Zomoto का होतोय Twitter वर हॅशटॅग ट्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:43 AM2021-10-19T10:43:38+5:302021-10-19T10:51:44+5:30

Zomato विरोधात सोशल मीडियावर युझर्सकडून एक मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, #Reject_Zomato हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातही अनेकदा अशाप्रकारची मागणी झाली आहे आणि होतही आहे.

reject zomato trends twitter after its executive allegedly says hindi is national language to tamil user | "धंदा करने का है तो...."; #Reject_Zomoto का होतोय Twitter वर हॅशटॅग ट्रेंड?

"धंदा करने का है तो...."; #Reject_Zomoto का होतोय Twitter वर हॅशटॅग ट्रेंड?

googlenewsNext
ठळक मुद्दे#Reject_Zomato हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.यापूर्वी महाराष्ट्रातही अनेकदा अशाप्रकारची मागणी झाली आहे आणि होतही आहे.

Food Delivery अॅप Zomato पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हसोबत कस्टमरच्या चॅटचा एक स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं Zomato एक्झिक्युटिव्ह कडून आपल्याला हिंदी शिकण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. "कस्टमर केअरसंच असं म्हणणं आहे की मला हिंदी येत नसल्यामुळे आम्ही रिफंड करू शकत नाही. त्यांनी मी खोटा असल्याचंही म्हटलं. याशिवाय कर्मचाऱ्यानं हिदी ही आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना ती थोडी तरी आली पाहिजी असं म्हटलं," असा आरोप विकास नावाच्या एका व्यक्तीनं स्क्रिनशॉट शेअर करत केला.

यानंतर अनेकांनी Zomato ला हिंदी ही आपली राष्ट्राभाषा आहे का असा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. याविरोधात युझर्सनं आता सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली असून #Reject_Zomato हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसंच अनेकांनी Zomato नं यावर स्पष्टीकरण द्यावी अशी मागणीही केली आहे. 







काय आहे प्रकरण?
#Reject_Zomato या ट्रेंडची सुरूवात विकास नावाच्या एका युझरपासून झाली. त्यांच्या ट्वीटनुसार त्यानं ऑर्डर केलेल्या पदार्थांपैकी एक पदार्थ त्याला मिळाला नव्हता. त्यानं अॅपवर यासंदर्भात कस्टमर केअरशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं रिफंडची मागणी केली. दरम्यान, त्यानं शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार संबंधित कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला तो ज्या भाषेत बोलत होता ते समजत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर विकासनं जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे ज्यांना स्थानिक भाषेचं ज्ञान आहे, असं त्यानं म्हटलं. यावर उत्तर देताना एक्झिक्युटिव्हनं हिंदी आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना थोडंफार हिंदी तर आलंच पाहिजे असा रिप्लाय दिला. यापूर्वीही अनेकदा झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. 

यापूर्वी महाराष्ट्रातही मराठीसाठी आवाज उठवण्यात आला होता. दुकानांवरील पाट्या, एटीएममध्ये मराठी भाषेचा पर्याय किंवा ऑनलाईन अॅपमध्येही मराठीच्या पर्यायासाठी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी मनसेनं Amazon वर मराठीचा पर्याय मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर Amazon नं तात्काळ बदल करत खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.

Web Title: reject zomato trends twitter after its executive allegedly says hindi is national language to tamil user

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.