शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

लष्करात नसल्याचा रोज पश्चात्ताप होतो - गौतम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 11:03 AM

आपण जर क्रिकेटर नसतो, तर नक्की लष्करात असतो...कारण ते माझं पहिलं प्रेम आहे असं गंभीरने सांगितलं आहे

नवी दिल्ली - क्रिकेटर गौतम गंभीरचं देशप्रेम आणि लष्कर जवानांबद्दलची आपुलकी सर्वांनाच माहित आहे. त्याचं हे प्रेम आणि आदर फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित नाहीये. गौतम गंभीर निमलष्करी दलाशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांना शक्यती मदत करण्याचा सर्वोपतरी प्रयत्न करत असतो. सध्या गौतम गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा खर्च उचलत आहे. मला हे सर्व करायला आवडतं, असं गंभीर आवर्जून सांगतो. 'आपण जर क्रिकेटर नसतो, तर नक्की लष्करात असतो कारण ते माझं पहिलं प्रेम आहे', असंही गंभीरने सांगितलं आहे. जेव्हा कधी आपण जवानांबद्दल विचार करतो, तेव्हा मनात गर्व आणि अंगावर काटा उभा राहतो असं गंभीरने म्हटलं आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरु असलेली तयारी पाहण्यासाठी गुरुवारी गौतम गंभीर इंडिया गेटवर पोहोचला होता. यावेळी टाइम्स ऑफ इंडियासोबत केलेल्या बातचीतमध्ये गौतम गंभीरने लष्कराबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. गंभीरने यावेळी सांगितलं की, 'लष्कर माझं पहिलं प्रेम आहे आणि जर मी क्रिकेटर नसतो तर नक्की लष्करात असतो'. पुढे बोलताना त्याने म्हटलं की, 'मला दर दिवशी आपण लष्कराचा भाग नसल्याचा पश्चात्ताप होतो'. 

गौतम गंभीर सुकमा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना शक्य ती सर्व मदत करत आहे. यासंबंधी बोलताना त्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत असल्याची माहिती दिली. 'आपण त्यांच्या कुटुंबाला पुर्ण करु शकत नाही, पण शिक्षणासाठी काही मदत तर निश्चित करु शकतो', असं गौतम गंभीरने सांगितलं आहे. 

राष्ट्रगीताचा सन्मानराष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे असं गंभीरने सांगितलं आहे. जेव्हा कधी राष्ट्रगीत वाजतं तेव्हा आपण 52 सेकंद उभे राहतो असं गंभीरने सांगितलं आहे. राष्ट्रगीतावरुन सुरु असलेला वाद विनाकारण असल्याचं गंभीरने सांगितलं आहे. राष्ट्रगीतावरुन वाद होण्याची कोणतीही गरज नव्हती. जर तुम्ही राष्ट्रगीताचा सन्मान करु शकत नसाल तर मग तुम्ही कोणत्या गोष्टीची अपेक्षा करु शकता ? असा सवाल गंभीरने विचारला आहे. गंभीरने म्हटलं आहे की, जर असंच सुरु राहिलं तर येणा-या दिवसांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टवरही प्रश्न उपस्थित होतील. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८