शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णास भेटू देण्यास नकार; सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड डॉक्टरांना मारहाण : रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अफवेने उडाला गोंधळ

By admin | Updated: June 7, 2016 07:41 IST

जळगाव: अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णास भेटू देण्यास नकार देत कंपाऊडरने नातेवाईकावर लोखंडी सळई उगारल्याने संतप्त नातेवाईकांनी कंपाऊंडरला मारहाण करत सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, यावेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ उडाला.

जळगाव: अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णास भेटू देण्यास नकार देत कंपाऊडरने नातेवाईकावर लोखंडी सळई उगारल्याने संतप्त नातेवाईकांनी कंपाऊंडरला मारहाण करत सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, यावेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ उडाला.
धानवड ता.जळगाव येथील शिवाजी भिका पाटील (वय ३५) यांना शनिवारी सहयोग क्रिटीकल या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिमद्य सेवनामुळे शरीरातील क्षार कमी झाल्याने पाटील यांच्या मेंदू व शरीरातील नसांना सुज येत आहे, त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
भेटण्यावरून पडली वादाची ठिणगी
शिवाजी पाटील यांना दाखल केले त्या दिवसापासून त्यांची प्रकृती बरी होती. दररोज ते आहार घेत होते. सोमवारी सकाळी त्यांना भेटण्यास डॉक्टरांनी मज्जाव केला. दररोज त्यांना आहार दिला जात असताना आज आहार दिला गेला नाही, त्यामुळे त्यांची तब्येत चिंताजनक झाली असावी अशी शंका नातेवाईकांना आली. संध्याकाळी भाऊ रवींद्र भिका पाटील व चुलत भाऊ मनोज विठ्ठल पाटील यांनी पुन्हा रुग्णास भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तेव्हाही कंपाऊंडरने भेटू दिले नाही. त्यामुळे रुग्णाच्या तब्येतीविषयी नातेवाईकांची चिंता अधिकच वाढली, आणि तेथे वादाची ठिणगी पडली.
कंपाऊडरने लोखंडी सळई काढली
या वादात एका कंपाऊंडरने रुग्णाच्या नातेवाईकास मारण्यासाठी लोखंडी सळई काढली, त्यामुळे संतप्त दहा ते पंधरा नातेवाईकांनी रुग्णालयाच्या काचा फोडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी खुर्च्याही फेकण्यात आल्या.त्याच दरम्यान, रुग्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ झाला. काही नातेवाईक डॉ.मनोज पाटील, डॉ.सुनील पाटील , डॉ.ए.आर.खेडकर व कर्मचारी अलका काळे यांच्या अंगावर धावून गेले. जमावाच्या संतप्त भावना पाहता डॉक्टर व कर्मचार्‍यांनी स्वत:चा बचाव केला.
शिवसैनिक दाखल
दाखल रुग्ण हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या गावाचा असल्याने ते लागलीच रुग्णालयात धावून आले. त्यांच्यासोबत महानगर प्रमुख कुलभूषण पाटील, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक धावून आले. त्यापाठोपाठ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक निरीक्षक दीपक गंधाले, जानकर यांच्यासह कर्मचार्‍यांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. ठाकूर व शिवसेच्या पदाधिकार्‍यांनी डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून वाद मिटवला.