शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबीच! कट रचणाऱ्या काश्मिरी आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:20 IST

Red Fort Blast: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील रविवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आमिर राशिद अली या काश्मीरमधील व्यक्तीला दिल्लीत अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील रविवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आमिर राशिद अली या काश्मीरमधील व्यक्तीला दिल्लीत अटक केली. याच आमिर अलीची कार बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आली होती. तशी नोंदणी त्याच्या नावावर आढळून आली आहे.

आमिर अली हा या प्रकरणातील मुख्य आत्मघाती हल्लेखोर दिल्ली बॉम्बस्फोट डॉ. उमर नबी याच्याबरोबर दहशतवादी हल्ल्याला अंतिम स्वरुप देण्याच्या कटात सामील असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. आमिर अली हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील संबुरा या गावाचा रहिवासी आहे. त्याने व डॉ. नबीने मिळून हल्ल्याचा कट रचला होता.

'डॉ. उमर नबी हाच आत्मघाती हल्लेखोर'

डॉ. नबीला कार खरेदी करून देण्याच्या उद्देशाने आमिर दिल्लीत आला होता. त्याने कारमध्ये दुरुस्त्या करून त्यात स्फोटके बसवली होती. रविवारी एनआयएने पहिल्यांदाच डॉ. नबी याला दिल्ली बॉम्बस्फोटाचा मुख्य 'आत्मघाती हल्लेखोर' म्हणून घोषित केले. डॉ. नबी यानेच कार चालवली व त्याने स्फोट घडवून आणला असे एनआयएने स्पष्ट केले आहे. एनआयएने पहिल्यांदाच या कारमध्ये आयईडी होता याची केसमध्ये नोंद केली आहे. या आधी डॉ. नबी हाच कार चालवत होता हे फोरेन्सिक चाचणीतून निष्पन्न झाले आहे. दरम्यान एनआयएने डॉ. नबीचे आणखी एक वाहन जपत केले असून तपासणी सुरू आहे.

७३ प्रत्यक्षदर्शीची करण्यात आली आतापर्यंत चौकशी

गृहखात्याने तपास सोपवल्यानंतर एनआयएने आतापर्यंत ७३ प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली असून दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उ. प्रदेश पोलिस व अन्य तपास यंत्रणांच्या समन्वयातून एनआयए आपला तपास करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Suicide Bomber Dr. Nabi; Kashmiri Conspirator Arrested

Web Summary : NIA arrested Amir Rashid Ali for the Delhi blast. Ali's car was used. Dr. Umar Nabi is identified as the suicide bomber, conspiring with Ali. Seventy-three witnesses have been questioned.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट