शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:17 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर खोचक टीका केली होती, त्याला सिंहांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पाटणा: बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी तीव्र झाले आहे. आराहमधील कार्यक्रमात आरसीपी सिंह यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'नितीश कुमारांनी माझा दर्जा काढण्याऐवजी स्वतःकडे पाहावे. बिहारमध्ये जेव्हा त्यांचा काहीच दर्जा नव्हता, तेव्हाही आणि आजही मी त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे,' अशी टीका सिंह यांनी केली.

'ते नापास झाले अन् मी IAS'जनता दल युनायटेड (जेडीयू) चे माजी नेते आणि राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह पुढे म्हणाले की, 'जेव्हा नितीश कुमार काहीच नव्हते आणि तिकिटासाठी फिरायचे, तेव्हा मी 1982 मध्ये IAS झालो होतो, त्यांनी माझा दर्जा काय मोजावा. नितीश कुमार यांनी नौदलाची परीक्षा दिली होती, ते त्यात नापास झाले आणि मी IAS परीक्षेत संपूर्ण भारतात 13वा क्रमांक मिळवला होता.'

आरसीपी सिंह पुढे म्हणतात, 'लोकशाहीच्या या देशात सर्व नागरिक हा सन्मान आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर आरसीपी सिंह म्हणाले की, माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, सध्या मी कार्यकर्त्यांना भेटत आहे, पुढे काय होईल माहित नाही.' नितीश कुमार पंतप्रधान पदाचा चेहरा बनण्याच्या प्रश्नावर आरसीपी सिंह म्हणतात की, 'ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते दावेदार आहेत. नितीश कुमार स्वत:ला मोठे नेते मानतात, ते इतरांना नेता मानतील की नाही, यात शंका आहे.'

नितीश कुमारांची खोचक टीकाकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आरसीपी सिंह यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता ते संतापले. सीएम नितीश कुमार म्हणाले होते की, 'कोणाचेही नाव घेऊ नका, त्यांचा दर्जा काय अन् माझा दर्जा काय. यापुढे माझ्यासमोर त्यांचे नाव घेऊ नका. ते एक आयएएस होते, त्यांना मी खाजगी सचिव बनवले आणि नंतर राजकारणात आणले. मला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका.'

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा