शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय; सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 10:43 PM

चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक करणंदेखील रोजगार आहे असंही म्हणाल का; नेटकऱ्यांचा सवाल

मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावणारे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा फेटाळताना प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला होता. त्यावरुन सोशल मीडियानं प्रसाद यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याचे पडसाद ट्विटरवर लगेचच पाहालया मिळाले. या सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय, असं ट्विट एका वापरकर्त्यानं केलं आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं उद्या हे सरकार चित्रपटगृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार करण्यालाही रोजगार म्हणेल, असा टोला लगावला आहे. चित्रपट उत्तम कमाई करत असल्यानं अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद यांची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुलाई केली आहे. प्रसाद यांचाच तर्क वापरायचा झाला तर मग २००८ मध्ये केआरकेच्या देशद्रोही चित्रपटानं १० लाखदेखील कमावले नव्हते. मग ते वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट होतं असं म्हणायचं का, असा प्रश्न एकानं विचारला आहे.  काय म्हणाले होते रवीशंकर प्रसाद?'मला चित्रपट अतिशय आवडतात. सध्या चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. २ ऑक्टोबरला ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकारानं दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानंच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,' असं प्रसाद यांनी म्हटलं होतं.

 

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादEconomyअर्थव्यवस्थाSocial Mediaसोशल मीडिया