Ravi Shankar prasad statement withdraw after troll in social media | 'ती' तुलना महागात पडली; नेटकऱ्यांच्या 'प्रसादा'नंतर रवीशंकर यांच्याकडून विधान मागे

'ती' तुलना महागात पडली; नेटकऱ्यांच्या 'प्रसादा'नंतर रवीशंकर यांच्याकडून विधान मागे

मुंबई : जगभरातील वित्तीय संस्था आणि अर्थशास्त्री मंदीच्या सावटाबाबत चिंता व्यक्त करत असताना, भाजपचे केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी देशातील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे फेटाळून लावले होते. २ अ‍ॅाक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत असल्याचे विधान रवीशंकर प्रसाद यांनी केलं होतं. या विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र आज प्रसिद्धपत्रक काढून मी संवेदनशील व्यक्ती असल्याने मी केलेलं विधान मागे घेत असल्याचे सांगितले आहे.

रवीशंकर प्रसाद जाहीर केलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हणाले की, चित्रपटसृष्टीमुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहे. तसेच अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच प्रसारमाध्यमांसोबत झालेल्या संवादाचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध असून माझ्या संभाषणाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी संवेदनशील व्यक्ती असल्याचे केलेलं विधान मागे घेत असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी प्रसिद्धपक्षकात म्हणले आहे. 

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. २ अ‍ॅाक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,’ असल्याचे विधान रवीशंकर यांनी केले होते. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, गणेश हाके उपस्थित होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ravi Shankar prasad statement withdraw after troll in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.