मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:27 PM2021-05-06T14:27:54+5:302021-05-06T14:34:51+5:30

Uttar Pradesh News : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता.

rats and ants ate dead body of woman in morchari in azamgarh district hospital | मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ

मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता. याशिवाय उंदीर आणि मुंग्यांनी मृतदेहाचा बहुतेक भाग खाल्ला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आजमगडमधील (Azamgarh) जिल्हात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह सडल्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरला होता. त्यामुळेच नंतर ही घटना उघडकीस आली. चार दिवस हा मृतदेह शवविच्छेदनगृहात पडून होता. मृतदेहाला मुंग्या आणि उंदीर खात राहिले. मात्र, तरीही या गोष्टीची कोणालाच कल्पना कशी नव्हती असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

 29 एप्रिलला संध्याकाळी बिलरियागंजमध्ये रस्त्यावर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. 32 वर्षीय अज्ञात महिलेला रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी पाच वाजता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी 30 एप्रिलला सकाळी महिलेचा मृत्यू झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला. सोबतच पोलिसांनाही शवविच्छेदन प्रक्रियेसाठी याबाबतची माहिती दिली. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मृतदेह हा तसाच पडून राहिल्याने उंदरांनी तो खाल्ला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"लोक ऑक्सिजनसाठी रडताहेत पण आमदार असून मी मदत करू शकत नाही"; भाजपा नेत्यांकडून योगींच्या दाव्यांची पोलखोल

देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. 

लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. 'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे. 

Read in English

Web Title: rats and ants ate dead body of woman in morchari in azamgarh district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.