अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:25 IST2026-01-14T14:23:22+5:302026-01-14T14:25:31+5:30
Rapti Sagar Express: ललितपूर रेल्वे स्थानकावरून एका ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण झाले. सीसीटीव्ही तपासले असता, नराधम आरोपी मुलीला घेऊन राप्ती सागर एक्स्प्रेसने पळून जात असल्याचे समोर आले.

AI Image
ललितपूर रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किलोमीटर धावली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. चिमुकलीचे अपहरण करून आरोपी राप्ती सागर एक्स्प्रेसने पळून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कुठेही न थांबवता थेट भोपाळ स्थानकावर नेण्यास सांगितले. रेल्वे पोलिसांच्या या धाडसी नियोजनामुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही आणि अवघ्या काही तासांत चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ललितपूर रेल्वे स्थानकावरून एका ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून आरोपी फरार झाला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती मुलीला घेऊन राप्ती सागर एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसली. राप्ती सागर एक्स्प्रेस स्थानकातून सुटली होती, त्यामुळे आरोपीला वाटेत कुठेही उतरण्याची संधी मिळू नये म्हणून वरिष्ठ पोलिसांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतला.
रेल्वे पोलिसांनी राप्ती सागर एक्स्प्रेसटे पुढचे सर्व थांबे रद्द केले आणि ट्रेनला ग्रीन सिग्नल देऊन ती २६० किलोमीटरपर्यंत कुठेही न थांबवता भापोळ रेल्वे स्थानकावर थांबवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, भोपाळ रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती.जशी राप्ती सागर एक्स्प्रेस भोपाळ स्थानकावर पोहोचली, तसे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी ट्रेनला घेराव घातला. आरोपीला पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. पोलिसांनी तातडीने डब्यात शिरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि चिमुकलीला त्याच्या तावडीतून सोडवले.
अगवा हुई बच्ची को बचाने के लिए 260 KM तक नहीं रुकी ट्रेन..
— Er. Aamir malik (@AamirMalick605) January 14, 2026
CCTV में दिखी एक छोटी सी गलती
GRP ने लिया बड़ा फैसला
260 KM तक ट्रेन दौड़ती रही
ताकि एक बच्ची सुरक्षित घर लौट सके
System ऐसा हो तो भरोसा बनता है। pic.twitter.com/QrE07S7gyv
रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच!
एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी अशा प्रकारे ट्रेन 'नॉन-स्टॉप' धाववण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील अचूक समन्वय आणि प्रसंगावधानामुळे एका निष्पाप मुलीचे प्राण वाचले आहेत. या कामगिरीबद्दल रेल्वे पोलिसांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.