शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! न्यायालयात सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 11:31 IST

पीडितेची प्रकृती गंभीर; उपचार सुरू

उन्नाव: सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडली. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास पाच तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर असल्यानं त्यानंतर तिला लखनऊमध्ये हलवण्यात आलं. बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला. आज सकाळी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये पीडित तरुणी ६० ते ७० टक्के भाजली आहे. तिच्यावर सध्या लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्हाला सकाळी या घटनेची माहिती मिळाली. पीडितेनं आरोपींची नावं आम्हाला सांगितली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रांत विर यांनी दिली. आम्ही आरोपीच्या शोधासाठी पथकं तयार केली आहेत. पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं. पीडितेनं मार्चमध्ये दोघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. बलात्कार करुन त्याचं चित्रीकरण केल्याचा आरोप पीडितेनं दोघांवर केला होता. यातील एकाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला न्यायालयानं जामीन दिला. तर दुसरा आरोपी फरार होता. आज पीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी फरार आरोपीदेखील तिथे होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट जारी करुन त्याच्या संपत्तीवर आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Rapeबलात्कार