बलात्कार करणारा आमदार आता सीतापूरच्या तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:26 IST2018-05-09T01:26:00+5:302018-05-09T01:26:00+5:30
उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले.

बलात्कार करणारा आमदार आता सीतापूरच्या तुरुंगात
उन्नाव - येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले.
आ. सेंगरचे काही नातेवाईक उन्नावच्या तुरुंगात अधिकारी आहेत. त्यामुळे आपणास न्याय मिळू शकणार नाही. सेंगर उन्नाव तुरुंगांत राहिल्यास आपल्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकेल, अशी भीतीही पीडितेने व्यक्त केली होती. हा खटला अन्य राज्यात, हलवावा, अशीही तिची मागणी आहे.
पीडिता व तिच्या कुटुंबीयांना याआधी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही पोलिसांनी न करता उलट तिच्या वडिलांना अटक केली होती. ते पोलीस कोठडीत मरण पावले होते. त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून आमदाराच्या भावालाही अटक झाली आहे. (वृत्तसंस्था)