भाजप आमदारावर बलात्काराचा गुन्हा, सहकारी महिलेनेच केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 11:48 IST2021-07-03T11:14:13+5:302021-07-03T11:48:40+5:30
उत्तराखंडमधील द्वाराहाटचे आमदार महेश नेगी यांच्यावरही असेच आरोप झालेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर विराेधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

भाजप आमदारावर बलात्काराचा गुन्हा, सहकारी महिलेनेच केला आरोप
डेहराडून : भाजपचे जवालपूर मतदारसंघाचे आमदार सुरेश राठोर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपमधील राठोर यांच्या माजी सहकारीने त्यांच्यावर हा आरोप केला आहे. हरिद्वारमधील बाहादाराबाद पोलीस ठाण्यात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला. राठोर यांच्यावर गुन्हेगारी धमक्या दिल्याचाही आरोप आहे, असे पोलीस म्हणाले.
उत्तराखंडमधील द्वाराहाटचे आमदार महेश नेगी यांच्यावरही असेच आरोप झालेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर विराेधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे.