शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

Rana Kapoor on Priyanka Gandhi: 'प्रियांका गांधींकडून 2 कोटींचे पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले', ED समोर राणा कपूरचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 10:24 IST

Rana Kapoor on Priyanka Gandhi: "पेंटिंगच्या व्यवहारातून दिलेल्या 2 कोटींचा उपयोग सोनिया गांधींच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी केला."

नवी दिल्ली: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर(Rana Kapoor) यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. "काँग्रेसच्या नेत्यांनी मला जबरदस्तीने प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडील एमएफ हुसेन यांची पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले, त्या मोबदल्यात मला पद्भभूषण देण्याचे आश्वासन दिले होते," असा धक्कादायक खुलासा कपूर यांनी केला आहे.

राणा कपूर यांनी ईडीला यापूर्वीच ही माहिती दिली होती. मात्र, 2020 मध्ये नोंदवण्यात आलेल्या जबाबाचा काही भाग आता समोर आला आहे. त्यात कपूर म्हणतात की, "काँग्रेसचे दिवंगत नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनीच हा व्यवहार करण्यास भाग पाडले होते. एमएफ हुसैन यांची पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिल्यास गांधी कुटुंबाशी असलेले त्यांचे संबंध बिघडतील आणि पद्म पुरस्कारही हातातून जाईल, असा इशारा देवरा यांनी दिला होता."

सोनिया गांधींच्या उपचारासाठी पैशांचा वापर

राणा कपूर यांनी दावा केला की, त्यांनी पेंटिंगसाठी 2 कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. तसेच, मिलिंद देवरा (मुरली देवरा यांचा मुलगा) यांनी त्यांना गुप्तपणे माहिती दिली की, या पेंटिंगच्या विक्रीतून मिळणारी रक्कम गांधी परिवार सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी वापरणार आहेत. तसेच, पेटिंग विकत घेतल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी मला फोन केला होता आणि  पेटिंग विकत घेतल्याबद्दल आभारही मानले होते. तसेच आगामी काळात देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी तुमचा विचार करू, असेही पटेल यांनी राणा कपूर यांना सांगितले होते, अशी माहितीही कपूर यांनी दिली. ईडीने शनिवारी राणा कपूर यांच्याविरोधात मुंबईतील पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये राणा कपूर यांच्या या जबाबाचा उल्लेख आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीYes Bankयेस बँक