रामटेक... जोड

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30

पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकावा, ही रामटेककरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.

Ramtek ... attach | रामटेक... जोड

रामटेक... जोड

्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकावा, ही रामटेककरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.
रामटेकच्या विस्तारीकरणाबाबत गोटेगावपर्यंत सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तोदेखील सर्व्हे अद्याप झाला नाही. रामटेकचे माजी खा. मुकुल वासनिक यांनी विस्तारीकरणाच्या चर्चांना वेग दिला. मात्र, त्यानंतर सर्वकाही शांत पडले. विद्यमान खा. कृपाल तुमाने यांनी अद्याप तरी रामटेकसाठी काहीही केले नसल्याचा आरोप काहींनी केला. रामटेक रेल्वेच्या विस्तारीकरणाचा आवाज त्यांनी लोकसभेत रेल्वे मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवावा, अशी रामटेकरांची अपेक्षा आहे. आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीदेखील केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरींच्या माध्यमातून रामटेक विस्तारीकरणाचा प्रश्न लोकसभेत मांडावा तसेच विधानसभेतही आवाज बुलंद करावा, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, रामटेक हे ना. गडकरींचे सासर आहे. सासरची रेल्वे जावयांनी पुढे रेटावी, ही रामटेककरांची अपेक्षा रास्त आहे.
...
पर्यटनासह व्यापार वाढेल
रामटेक रेल्वे नॅशनल रुटवर आल्यास पर्यटनासोबतच व्यापारवृद्धी होईल. राजकीय इच्छाशक्तीमुळे कठीण कामे सोपी होतात व सोपी कामे अनेक वर्षे रेंगाळली जातात, याचे उदाहरण म्हणजे रामटेक रेल्वेचे विस्तारीकरण आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीन वृत्तीमुळे ही रेल्वे रामटेकातच अडकून पडली आहे. रेल्वेने अदानींच्या तिरोडा येथील पॉवर प्रोजेक्टसाठी रामटेक रेल्वे स्टेशनवर दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला. येथे रामटेक लोकल व मँगनीजची मालगाडी याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही रेल्वे ये-जा करीत नाही. त्यामुळे दुसरा प्लॅटफॉर्म कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्लॅटफॉर्मसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ही कोल सायडिंग जागरूक नागरिकांच्या रेट्यामुळे अदानींना बंद करावी लागली, त्यामुळे तो खर्च व्यर्थ ठरला. अदानींसाठी कोट्यवधी रुपये रेल्वे वाया घालवू शकते; मात्र रामटेक रेल्वेचा स्वातंंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही विस्तार करू शकत नाही, हे अनाकलनीय आहे.

Web Title: Ramtek ... attach