बाबो! हनिमूनच्या रात्री पोटात दुखलं अन् सकाळी नववधूने दिला बाळाला जन्म; गावकरी झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:56 IST2026-01-26T12:56:02+5:302026-01-26T12:56:52+5:30

लग्नानंतर अवघ्या काही तासांतच नववधूने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हनिमूनच्या आधीच घरात पाळणा हालल्याने ही बाब संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे.

rampur bride gives birth on wedding night up new | बाबो! हनिमूनच्या रात्री पोटात दुखलं अन् सकाळी नववधूने दिला बाळाला जन्म; गावकरी झाले हैराण

बाबो! हनिमूनच्या रात्री पोटात दुखलं अन् सकाळी नववधूने दिला बाळाला जन्म; गावकरी झाले हैराण

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण परिसर हैराण झाला आहे. अजीमनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कुम्हरिया गावात लग्नानंतर अवघ्या काही तासांतच नववधूने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हनिमूनच्या आधीच घरात पाळणा हालल्याने ही बाब संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुम्हरिया येथील रहिवासी असलेल्या रिझवान नावाच्या तरुणाचा लग्न बहादूरगंज येथील एका तरुणीशी ठरलं होतं. या दोघांमध्ये आधीपासूनच प्रेमसंबंध होते आणि दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची बोलणी सुरू होती. काही दिवसांपूर्वीच तरुणीने अजीमनगर पोलीस ठाण्यातील मुरसैना चौकीत जाऊन लग्नाची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस आणि ग्रामप्रधानांच्या मध्यस्थीने दोन्ही कुटुंबांत तडजोड होऊन हे लग्न लावून देण्यात आलं.

शनिवारी संध्याकाळी रिझवान काही लोकांसह बहादूरगंज गावी पोहोचला आणि रीतसर लग्नानंतर नववधूला आपल्या घरी घेऊन आला. हनिमूनच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास नववधूच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या, ज्यामुळे घरात गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या महिला डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि रविवारी पहाटे घरात नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नववधूने एका मुलीला जन्म दिल्याचे समोर आले.

ही बातमी गावात पसरताच शेजारीपाजारी आणि महिलांची मोठी गर्दी झाली. धक्कादायक म्हणजे नवरदेवाने या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला. त्याने बाळाला कुशीत घेतलं आणि गावात मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. अजीमनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी करण सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास चौकी प्रभारींनी केला होता. तपासात असं समोर आलं की, त्या दोघांमध्ये आधीपासूनच प्रेमसंबंध होते आणि तरुणी गरोदर होती.

Web Title : हनीमून की रात दुल्हन ने दिया बच्चे को जन्म; गांववाले हैरान

Web Summary : उत्तर प्रदेश के रामपुर में, एक नवविवाहिता ने शादी के कुछ घंटों बाद एक बच्ची को जन्म दिया। दंपति का पहले से ही संबंध था। दूल्हे ने आश्चर्यजनक आगमन को स्वीकार किया और जश्न मनाया।

Web Title : Bride Gives Birth on Honeymoon Night; Villagers Stunned

Web Summary : In Rampur, Uttar Pradesh, a newlywed delivered a baby girl hours after her wedding. The couple had a pre-existing relationship. The groom accepted and celebrated the surprise arrival.