Ramdas Athavale praised PM Narendra Modi through poetry in Rajya Sabha | "मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार, इसलिए उनको देश के मजदूर करते है प्यार" आठवलेंच्या कवितेने राज्यसभेत आणली बहार

"मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार, इसलिए उनको देश के मजदूर करते है प्यार" आठवलेंच्या कवितेने राज्यसभेत आणली बहार

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खांद्यावर सर्व मजुरांचा भार घेतला आहेकामगार कल्याणमंत्री संतोष गंगवार हे विचारी आणि शांतचित्त व्यक्ती आहेतगंगवार यांच्यामध्ये कामगारांना न्याय देण्याची हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत

नवी दिल्ली - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज रामदास आठवले यांनी राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान काव्यवाचन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांना पाठिंबा जाहीर करत धमाल उडवून दिली.

राज्यसभेमध्ये आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यकारी अधिनियम, २०२० औद्योगिक संबंध अधिनियम, २०२० आणि सामाजिक सुरक्षा विधेयक अधिनियम, २०२० वर चर्चा सुरू होती. त्यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात काव्यात्मक मांडणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी मांडलेल्या कामगार विषयक धोरणाला पाठिंबा जाहीर केला. काव्यवाचन करताना आठवले म्हणाले की,
मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार
इसलिए उनको देश के मजदूर करते है प्यार!
संतोष गंगवार है आदमी सोबर
इसलिए उन्हे डिपार्टंमेंट मिला हे लेबर!
लेबरोंको न्याय देनेकी गंगवारजीमे है हिंमत
इसलिए हम सब उनको देते है हिंमत!पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खांद्यावर सर्व मजुरांचा भार घेतला आहे. त्यामुळे देशातील मजूर त्यांच्यावर प्रेम करतात. तर कामगार कल्याणमंत्री संतोष गंगवार हे विचारी आणि शांतचित्त व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना कामगार खातं मिळालं आहे. त्यांच्यामध्ये कामगारांना न्याय देण्याची हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, असा आठवलेंनी सादर केलेल्या या कवितेच अर्थ होतो.  

"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र

 राज्यसभेत कृषी विधेयके मांडली जात असताना गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. याच दरम्यान केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून एक मागणी केली आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे असं म्हटलं आहे. 

खासदार तरीही तसेच वागले तर उर्वरीत कार्यकाळासाठी त्यांना निलंबित केले पाहिजे अशा मागणीचे पत्र आठवले यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं आहे. रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत एक ट्विट केलं आहे. "गोंधळ घालणाऱ्या खासदारांच्या पहिल्या चुकीबद्दल एक वर्ष आणि दुसऱ्या चुकीबद्दल संसदीय कार्यकाळापर्यंत निलंबित केले जावे आणि भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी संसदेत एक विधेयक आणलं गें पाहिजे" असं आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या
श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे  

English summary :
Ramdas Athavale praised PM Narendra Modi through poetry in Rajya Sabha

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ramdas Athavale praised PM Narendra Modi through poetry in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.