Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 04:35 PM2020-08-05T16:35:20+5:302020-08-05T16:40:38+5:30

अयोध्येमधील राम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विशेष मागणी केली.

Ram Mandir Bhumipujan : The priests who performed the Bhumi Pujan of Ram Mandir asked Modi for Dakshina ... | Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...

Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...

Next
ठळक मुद्दे कुठल्याही यज्ञामध्ये दक्षिणा महत्त्वाची असतेआज दक्षिणा तर आज एवढी मिळाली आहे की आज अब्जावधी आशीर्वाद प्राप्त होत आहेतभारत हा आमचा आहेच, मात्र त्यावर अजून काही तरी द्या

अयोध्या - अयोध्येमधील राम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. दरम्यान, या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यजमान म्हणून राम मंदिराची कोनशिला ठेवली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विशेष मागणी केली. .

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराची कोनशिला स्थापित केल्यानंतर पूजनाचा संकल्प करताना पुरोहित म्हणाले की, कुठल्याही यज्ञामध्ये दक्षिणा महत्त्वाची असते. पण आज दक्षिणा तर आज एवढी मिळाली आहे की आज अब्जावधी आशीर्वाद प्राप्त होत आहेत. भारत हा आमचा आहेच, मात्र त्यावर अजून काही तरी द्या. काही समस्या आहेत. त्या समस्या दूर करण्याचा संकल्प तुम्ही केलेलाच आहे. आता ५ ऑगस्टच्या दिवशी त्यामध्ये अजून काही संकल्पांचा समावेश झाला तर देवाची कृपा होईल.

दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे येथे येणे स्वाभाविकच होते. आज इतिहास रचला जात आहेकन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर "राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम", असे म्हणतशतकांची प्रतीक्षा आज संपत आहेराम जन्मभूमी आज मुक्त झाली आहेअनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहेअसे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले, अनेकांना तर विश्वासच बसत नसेल, की ते याची देही याची डोळा राम मंदिराचे भूमिपूजन होताना पाहात आहेत. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्याची मला राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे संधी दिली. मी त्यांचे आभार मानतो

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Web Title: Ram Mandir Bhumipujan : The priests who performed the Bhumi Pujan of Ram Mandir asked Modi for Dakshina ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.