Raksha Bandhan: हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना भीषण अपघात, महिलेचा मुलीसह जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 05:05 PM2021-08-22T17:05:40+5:302021-08-22T17:06:58+5:30

Raksha Bandhan, Accident News: रक्षाबंधनाचा आजचा दिवस एका बहिणीसाठी अखेरचा दिवस ठरला. रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी जात असलेल्या या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

Raksha Bandhan: A woman died on the spot along with her daughter in a tragic accident while going to her brother for Rakshabandhan | Raksha Bandhan: हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना भीषण अपघात, महिलेचा मुलीसह जागीच मृत्यू 

Raksha Bandhan: हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना भीषण अपघात, महिलेचा मुलीसह जागीच मृत्यू 

Next

करनाल (हरियाणा)- रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील गोडवा अधोरेखित करणारा सण. आज रक्षाबंधनानिमित्त भावाकडे जाण्यासाठी अनेक महिलांची सकाळपासून लगबग सुरू आहे. (Raksha Bandhan) मात्र रक्षाबंधनाचा आजचा दिवस एका बहिणीसाठी अखेरचा दिवस ठरला. रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी जात असलेल्या या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. (Accident News) ही महिला भावाला राखी बांधण्यासाठी शामली (उत्तर प्रदेश) येथून पानीपत येथे जात होते. (Accident in Karnal) मात्र करनालमधील घरोंडा येथे झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. (A woman died on the spot along with her daughter in a tragic accident while going to her brother for Raksha bandhan)

रक्षाबंधनादिवशी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ही महिला शेकडो किलोमीटचे अंतर पार करून जात होती. तिच्यासोबत तिचा पती आणि मुलगीही होते. राखी बांधण्यासाठी बहीण एवढ्या लांबून आली म्हणून भाऊ आनंदित होईल, असे तिला वाटत होते. मात्र हा दिवस तिच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल. याची तिला कल्पनाही नव्हती. पती आणि मुलीसह भावाकडे जात असताना बडसत गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

हा अपघात एवढा भयानक होता की त्यामध्ये आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर पती जखमी झाला आहे. बडसत गावापासून पानीपत काही किलोंमीटर अंतरावरच होता. बहीण भावाला आणि भाची मामाला भेटण्यासाठी उत्सुक होती. मात्र घर काही अंतरावर असतानाच त्यांचा आयुष्याचा प्रवास संपला.

दरम्यान, सध्या मृत महिला आणि तिच्या मुलीचे शवविच्छेदन सुरू आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. तर ट्रकचालक फरार आहे. मृत महिलेचा पती योगेंद्र हा जखमी झाला असून, तो सीमा सुरक्षा दलातील जवान आहे. सध्या तो सिक्कीममध्ये तैनात होता. काही दिवसांपूर्वी तो एक महिन्याची सुट्टी घेऊन घरी आला होता.  

Web Title: Raksha Bandhan: A woman died on the spot along with her daughter in a tragic accident while going to her brother for Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.