राज्यसभा निवडणूक : ११ पैकी नऊ जागांवर एनडीए उमेदवारांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:04 IST2026-03-17T07:03:27+5:302026-03-17T07:04:34+5:30

बिहारच्या सर्व ५ जागांचे आणि ओडिशाच्या ४ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यावर एनडीएच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

Rajya Sabha elections: NDA candidates win resounding victory in nine out of 11 seats | राज्यसभा निवडणूक : ११ पैकी नऊ जागांवर एनडीए उमेदवारांचा दणदणीत विजय

राज्यसभा निवडणूक : ११ पैकी नऊ जागांवर एनडीए उमेदवारांचा दणदणीत विजय

नवी दिल्ली : हरयाणा, बिहार, ओडिशा येथील ११ राज्यसभा जागांसाठी सोमवारी निवडणुका झाल्या. या तिन्ही राज्यांमध्ये एकूण १४ उमेदवार मैदानात होते. बिहारच्या सर्व ५ जागांचे आणि ओडिशाच्या ४ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यावर एनडीएच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रत्येकी ४४ मतांसह विजय मिळवला. रामनाथ ठाकूर यांना ४२ मते आणि उपेंद्र कुशवाहा यांना ४२ मते मिळाली. ओडिशामध्ये भाजपचे मनमोहन सामल, सुजीत कुमार आणि एनडीएने पाठिंबा दिलेले उमेदवार दिलीप रे यांनी विजय मिळवला. हरयाणामध्ये दोन जागांसाठी निवडणूक झाली. मात्र काँग्रेस आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्यानंतर मोजणी थांबविण्यात आली.
 

Web Title : राज्यसभा चुनाव: एनडीए ने ग्यारह में से नौ सीटें जीतीं

Web Summary : बिहार और ओडिशा राज्यसभा चुनावों में एनडीए उम्मीदवारों की जीत, ग्यारह में से नौ सीटें हासिल हुईं। बिहार में नीतीश कुमार और भाजपा के नितिन नवीन प्रमुख विजेता रहे। कांग्रेस के वोटों पर आपत्तियों के कारण हरियाणा की गिनती रुकी।

Web Title : NDA Secures Victory on Nine of Eleven Rajya Sabha Seats

Web Summary : NDA candidates triumphed in Bihar and Odisha Rajya Sabha elections, securing nine out of eleven seats. Key winners include Nitish Kumar and BJP's Nitin Naveen in Bihar. Haryana's count is paused due to Congress votes objections.