Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:26 IST2025-10-12T13:22:45+5:302025-10-12T13:26:08+5:30
Rajya Sabha Election 2025: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात एका मुस्लीम उमेदवाराचाही समावेश आहे.

Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
BJP Candidates Rajya Sabha Elections 2025: जम्मू काश्मीरमधील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. तीन जागांसाठी भाजपने एका मुस्लीम नेत्यालाही संधी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनेही आपले उमेदवार घोषित केले आहेत.
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार मैदानात उतरवले. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीन उमेदवारांची यादी जाहीर केली.
भाजपने एका जागेवर गुलाम मोहम्मद मीर यांना उमेदवारी दिली आहे. दुसरे नावे राकेश महाजन यांचे आहे, तर सत पाल शर्मा यांनाही राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही नावे जाहीर केली.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने जम्मू एवं कश्मीर में होने वाले तीन अलग-अलग अधिसूचना के द्विवार्षिक राज्य सभा चुनाव 2025 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/KJFjE5KjAl
— BJP (@BJP4India) October 12, 2025
नॅशनल कॉन्फरन्स, भाजपचे संख्याबळ किती?
राज्यसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सनेही उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सचे विधानसभेतील संख्याबळ समान आहे. नॅशनल कॉन्फरन्सला तीन जागांवर आघाडी आहे. तर भाजपला एका जागेवर आघाडी आहे. पण, नॅशनल कॉन्फरन्स चौथा उमेदवार उतवरण्याच्या विचारात आहे, त्यासाठी काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे.