शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

प्रत्येक निवडणुकीत फटका, आता गड भेदण्याचे आव्हान; अंतर्गत गटबाजीचे ग्रहण काॅंग्रेसचा पिच्छा साेडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:28 AM

भूपेश बघेल यांच्या नावाला राजनांदगाव लोकसभा मतदार संघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती.

गजानन चोपडेरायपूर: ‘पेड के कटने का किस्सा नही होता, अगर कुल्हाडी मे लकडी का हिस्सा नही होता’, ही म्हण छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर तंतोतंत खरी ठरते. अंतर्गत राजकारणाचा फटका या पक्षाला प्रत्येक निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे  गटबाजीचे ग्रहण काँग्रेसचा पिच्छा सोडतच नाही, असे चित्र छत्तीसगडमध्ये दिसत आहे.

भूपेश बघेल यांच्या नावाला राजनांदगाव लोकसभा मतदार संघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती. आता तिसऱ्या टप्प्यात छत्तीसगडमधील ज्या सात जागांचा यात समावेश आहे त्यात कोरबा वगळता सहा जागांवर भाजपचा कब्जा आहे. राज्याची राजधानी असल्याने रायपूर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष असते. यंदा भाजपने भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रजमोहन अग्रवाल यांना मैदानात उतरविले आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे युवा नेते विकास उपाध्याय यांच्याशी होत आहे. १९९६ पासून हा गड भाजपने राखला आहे. तो भेदण्याचे आव्हान यंदा काँग्रेसपुढे आहे. 

पुन्हा नवा उमेदवारबिलासपूर मतदारसंघात दोन्ही निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलला. यंदाही नवीन उमेदवारच देण्यात आला आहे. येथे भाजपने तोखनराम साहू तर काँग्रेसने देवेंद्र यादव यांना मैदानात उतरविले आहे. दुर्गमधून भाजपचे विद्यमान खासदार विजय बघेल पुन्हा मैदानात आहेत. 

कोरबा मतदारसंघ अपवादछत्तीसगडच्या कोरबा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्योत्सना चरणदास महंत यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा भाजपने सरोज पांडेय यांना मैदानात उतरविले असून काँग्रेसकडून ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी वेगळी रणनिती आखली आहे.

मोदी लाट असतानाही २०१९ मध्ये काँग्रेसच्या ज्योत्सना चरणदास महंत कोरबा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे पक्षाने यंदा त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. तिकडे सरोज पांडेय या स्थानिक उमेदवार नसल्याचा मुद्दा काँग्रेस कॅश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :rajnandgaon-pcराजनांदगावcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chhattisgarh lok sabha election 2024छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४