शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

दीदी जिंकल्या, पण मोदीही हरले नाहीत; राजीव कुमारांची अटक टळली, पण हजर राहण्याचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 11:11 AM

ममता बॅनर्जी आणि सीबीआयमधला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी आणि सीबीआयमधला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.शारदा घोटाळ्यात एसआयटीला लॅपटॉप आणि मोबाईलसारखे सबळ पुरावे सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं राजीव कुमार यांना सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करण्यास सांगितलं आहे.

नवी दिल्ली- ममता बॅनर्जी आणि सीबीआयमधला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सीबीआयनं काल कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. शारदा घोटाळ्यात एसआयटीला लॅपटॉप आणि मोबाईलसारखे सबळ पुरावे सापडले आहेत. राजीव कुमार यांनी शारदा घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप सीबीआयनं केला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राजीव कुमार यांना सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करण्यास सांगितलं आहे.

शारदा घोटाळ्यातील पुराव्यांबरोबर छेडछाड करण्यात आलेली आहे. सुदिप्तो रॉय याला जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याजवळ लॅपटॉप आणि सेलफोन ताब्यात घेण्यात आला आहे. आम्हाला डेटाही मिळाला आहे. जे फक्त फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवायचे होते. तर अभिषेक मनु सिंघवी यांनी सीबीआयकडे अपुरे पुरावे असल्याचं सांगितलं आहे. तसेच कॉल रेकॉर्डसंदर्भात माहिती दिली आहे. अॅटर्नी जनरल म्हणाले, सीबीआयनं दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर कारवाई केली आहे. एफआयआर रोजवैलीविरोधात आहे.  राजीवकुमार आणि शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपींचं साटेलोटं असल्याचा आरोपही सीबीआयनं केला. सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीश गोगोई यांनी कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना शिलाँगमध्ये सीबीआयच्या समोर हजर राहण्यास सांगितलं आहे. राजीव कुमार यांना चौकशीसाठी कोणतीही अडचण असता कामा नये.  सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना नोटीस बजावली असून, सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालच्या मोदींच्या रॅलीच्या दोन दिवसांनंतर राजीव कुमार यांच्याबाबत असा प्रकार घडल्याला युक्तिवादही अभिषेक मनु सिंगवी यांनी केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार असून, राजीव कुमार यांनी वैयक्तिकरीत्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिलं आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय